Loksabha Election 2024 Maharashtra All Candidates Full List: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाने ठाणे, कल्याणसहीत नाशिकमधील उमेदवारांची आज अखेर घोषणा केली. ठाण्यामधून शिंदेंचे निकटवर्तीय नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना तिसऱ्यांदा खासदारकीचं तिकीट जाहीर झालं आहे. नाशिकमधूनही शिंदे गटाने सलग तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना तिकीट जाहीर केलं आहे. महायुतीमधील केवळ पालघरच्या जागेवरील उमेदवारीची घोषणा अद्याप (ही बातमी लिहीपर्यंत) जाहीर झालेला नाही. आज शिंदे गटाने तीन महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केल्याने महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे चित्र स्पष्ट झालं आहे. पाहूयात कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार आहे आणि कोणाविरुद्ध कोण उभं आहे...


पहिला टप्प्यातील मतदान -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 एप्रिल 2024 रोजी पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 5 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. कोणत्या मतदारसंघांमध्ये आणि कोणाविरुद्ध कोण रिंगणात आहे पाहूयात


1) रामटेक 
शिवसेना (शिंदे गट) - राजू पारवे
काँग्रेस - श्यामकुमार बर्वे
वंचित - किशोर गयभिजे


2) नागपूर 
भाजपा - नितीन गडकरी (विद्यमान खासदार)
काँग्रेस - विकास ठाकरे


3) भंडारा-गोंदिया 
भाजपा  - सुनील मेंढे (विद्यमान खासदार)
काँग्रेस - प्रशांत पडोले


4) चंद्रपूर 
काँग्रेस - प्रतिभा धानोरकर
भाजप - सुधीर मुनगंटीवार


5) गडचिरोली-चिमूर  (एसटीसाठी राखीव)
भाजपा - अशोक नेते (विद्यमान खासदार)
काँग्रेस - नामदेव किरसान


दुसऱ्या टप्प्यातील मतदान-


26 एप्रिल 2024 रोजी पार पडलं. या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 8 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. या टप्प्यात कोणाकोणाचं भविष्य मतपेटीत कोणत्या मतदारसंघातून कैद झालं पाहूयात


6) बुलढाणा 
शिवसेना (शिंदे गट) - प्रताप जाधव (विद्यमान खासदार)
शिवसेना (ठाकरे गट)- नरेंद्र खेडेकर
अपक्ष - रविकांत तुपकर


7) अमरावती 
भाजपा - नवनीत राणा (विद्यमान खासदार)
काँग्रेस - बळवंत वानखेडे
अपक्ष - आनंदराज आंबेडकर
प्रहार - दिनेश बुब


8) अकोला 
भाजपा - अनुप धोत्रे
वंचित बहुजन आघाडी- प्रकाश आंबेडकर
काँग्रेस - अभय पाटील


9) हिंगोली 
शिवसेना (शिंदे गट)- बाबुराव कदम कोहळीकर
शिवसेना (ठाकरे गट) - नागेश आष्टीकर


10) परभणी 
अपक्ष - महादेव जानकर
शिवसेना (ठाकरे गट) - संजय जाधव (विद्यमान खासदार)


11) वर्धा 
भाजपा - रामदास तडस (विद्यमान खासदार)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - अमर काळे


12) नांदेड 
भाजपा - प्रतापराव चिखलीकर (विद्यमान खासदार)
काँग्रेस - वसंत चव्हाण


13) यवतमाळ वाशीम 
शिवसेना (शिंदे गट) - राजश्री पाटील
शिवसेना (ठाकरे गट)-  संजय देशमुख


तिसऱ्या टप्प्यातील मतदान -


7 मे रोजी पार पडणार असून या टप्प्यात एकूण एकूण 11 मतदारसंघाचा समावेश आहे. हे मतदारसंघ आणि त्यामध्ये कोणत्या उमेदवारांचं नशिब मतपेटीत कैद होणार हे पाहूयात...


14) रायगड
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)- सुनील तटकरे
शिवसेना (ठाकरे गट) - अनंत गीते
 
15) बारामती 
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - सुनेत्रा पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - सुप्रिया सुळे


16) धाराशिव
भाजपा - अर्चना पाटील
शिवसेना (ठाकरे गट) - ओमराजे निंबाळकर (विद्यमान खासदार)
 
17) लातूर 
भाजपा - सुधाकर श्रृंगारे (विद्यमान खासदार)
काँग्रेस - शिवाजी काळगे


18) सातारा 
भाजपा - उदयनराजे भोसले
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - शशिकांत शिंदे
अपक्ष - अभिजीत बिचुकले


19) माढा 
भाजपा - रणजितसिंह नाईक निंबाळकर (विद्यमान)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - धैर्यशील मोहिते पाटील


20) सोलापूर 
भाजपा - राम सातपुते
काँग्रेस - प्रणिती शिंदे


21) सांगली 
भाजपा - संजय काका पाटील (विद्यमान खासदार)
शिवसेना (ठाकरे गट) - चंद्रहार पाटील
अपक्ष - विशाल पाटील


22) हातकणंगले
शिवसेना (शिंदे गट) - धैर्यशील माने (विद्यमान खासदार)
शिवसेना (ठाकरे गट) - सत्यजित पाटील सरुडकर
स्वाभिमानी पक्ष - राजू शेट्टी 


23) कोल्हापूर 
शिवसेना (शिंदे गट) - संजय मंडलिक (विद्यमान खासदार)
काँग्रेस - शाहू महाराज छत्रपती 


24) रत्नागिरी सिंधुदुर्ग 
भाजपा - नारायण राणे
शिवसेना (ठाकरे गट) - विनायक राऊत (विद्यमान खासदार)


चौथ्या टप्प्यातील मतदान-


13 मे रोजी पार पडणार असून या टप्प्यातही एकूण एकूण 11 मतदारसंघाचा समावेश आहे. हे मतदारसंघ आणि त्यामध्ये कोणत्या उमेदवारांचं नशिब मतपेटीत कैद होणार हे पाहूयात...


25) रावेर 
भाजप - रक्षा खडसे (विद्यमान)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)- श्रीराम पाटील


26) जळगाव 
भाजप - स्मिता वाघ
शिवसेना (ठाकरे गट)- किरण पाटील


27) संभाजीनगर 
शिवसेना (शिंदे गट)- संदीपान भुमरे
शिवसेना (ठाकरे गट) - चंद्रकांत खैरे
एमआयएम - इम्तियाज जलील (विद्यमान खासदार)


28) जालना 
भाजपा - रावसाहेब दानवे (विद्यमान)
काँग्रेस - कल्याण काळे


29) पुणे
भाजपा - मुरलीधर मोहोळ
काँग्रेस - रविंद्र धंगेकर
वंचित - वसंत मोरे


30) मावळ 
शिवसेना (शिंदे गट) - श्रीरंग बारणे (विद्यमान)
शिवसेना (ठाकरे गट) -संजोग वाघेरे


31) अहमदनगर 
भाजपा - सुजय विखे (विद्यमान खासदार)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - निलेश लंके
 
32) शिरूर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - शिवाजीराव आढळराव पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - अमोल कोल्हे (विद्यमान खासदार)


33) बीड 
भाजप - पंकजा मुंडे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) -बजरंग सोनवणे


34) शिर्डी 
शिवसेना (शिंदे गट) - सदाशिव लोखंडे (विद्यमान खासदार)
शिवसेना (ठाकरे गट) - भाऊसाहेब वाकचौरे


35) नंदुरबार 
भाजपा - हिना गावित
काँग्रेस - गोवाल पडवी


पाचव्या टप्प्यातील मतदान-


20 मे रोजी पार पडणार असून या टप्प्यातही एकूण एकूण 13 मतदारसंघाचा समावेश आहे. हे मतदारसंघ आणि त्यामध्ये कोणत्या उमेदवारांचं नशिब मतपेटीत कैद होणार हे पाहूयात...


36) धुळे 
भाजपा - सुभाष भामरे
काँग्रेस - शोभा बच्छाव


37) पालघर 
शिवसेना (ठाकरे गट) - भारती कामडी
भाजपा उमेदवार देणार मात्र नावाची घोषणा नाही


38) नाशिक 
शिवसेना (शिंदे गट)- हेमंत गोडसे 
शिवसेना (ठाकरे गट)- राजाभाऊ वाजे
बंडखोर- विजय करंजकर


39) दिंडोरी 
भाजपा - भारती पवार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - भास्कर भगरे


40) मुंबई उत्तर मध्य 
काँग्रेस - वर्षा गायकवाड
भाजपा - उज्वल निकम


41) कल्याण 
शिवसेना (शिंदे गट) - श्रीकांत शिंदे (विद्यमान खासदार)
शिवसेना (ठाकरे गट) - वैशाली दरेकर


42) ठाणे 
शिवसेना (शिंदे गट) - नरेश म्हस्के
शिवसेना (ठाकरे गट) - राजन विचारे (विद्यमान खासदार)


43) मुंबई दक्षिण
शिवसेना (ठाकरे गट) - अरविंद सावंत (विद्यमान खासदार)
शिवसेना (शिंदे गट)- यामिनी जाधव


44) मुंबई उत्तर पश्चिम 
शिवसेना (ठाकरे गट) - अमोल किर्तीकर
शिवसेना (शिंदे गट) - रविंद्र वायकर


45) मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य)
भाजपा - मिहिर कोटेचा
शिवसेना (ठाकरे गट) - संजय दीना पाटील


46) भिवंडी 
भाजपा - कपिल पाटील (विद्यमान खासदार)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - बाळ्या मामा म्हात्रे


47) मुंबई दक्षिण मध्य 
शिवसेना (शिंदे गट) - राहुल शेवाळे (विद्यमान खासदार)
शिवसेना (ठाकरे गट) - अनिल देसाई


48) मुंबई उत्तर
भाजपा - पीयूष गोयल
काँग्रेस- भूषण पाटील