मंगळ ग्रहाचं थेट UP, बिहारशी कनेक्शन; फोटो पाहिल्यावरच बसेल विश्वास

 भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचा मंगळ ग्रहाशी नेमका काय संबध आहे जाणून घेऊया.   

| Jun 18, 2024, 00:02 AM IST

Mars Craters:  मंगळ ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे मानवाचे स्वप्न आहे.  जगभरातील संशोधकांसह भारतीय संशोधक देखील मंगळ ग्रहावर संशोधन करत आहे. भारतीय संशोधकांना आपल्या शोध मोहिमेत मोठे यश आले आहे. भारतीय संशोधकांचा या यशाचा संबध थेट उत्तर प्रदेश आणि बिहारशी जोडण्यात आला आहे. 

1/7

भारतीय शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावर तीन नवीन विवर शोधली आहेत. 

2/7

हिलसा क्रेटर हे देखील 10 किलोमीटर रुंद आहे. पीआरएलचे दुसरे शास्त्रज्ञ डॉ. राजीव रंजन भारती यांचा जन्म हिलसा (बिहार) येथे झाला. त्यांच्या नावावरुन हे नाव देण्यात आलेय. 

3/7

मुरसान क्रेटर हे 10 किलोमीटर रुंद विवर आहे. पीआरएलचे वर्तमान संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मुरसानमध्ये झाला. यावरुन हे नाव देण्यात आले आहे. 

4/7

 लाल क्रेटर, मुरसान क्रेटर आणि हिलसा क्रेटर अशी नावे या विवरांना देण्यात आली आहेत. मुरसान आणि हिलसा ही  उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शहरांची नावे  आहेत.  लाल क्रेटरला पीआरएलचे माजी संचालक प्रोफेसर देवेंद्र लाल यांचे नाव देण्यात आले आहे.   

5/7

 या विवरांपैकी एकाला पीआरएलच्या माजी संचालकाचे नाव देण्यात आले आहे. तर, उर्वरित दोन विवरांना उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शहरांची नावे देण्यात आली आहेत.

6/7

मंगळ ग्रहावरील ज्वालामुखींनी भरलेल्या थार्सिस प्रदेशात ही तीन विवर शोधली आहेत. 

7/7

अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) च्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे.