Congress Maharashtra Loksabha Candidate List : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली जात आहे. आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत. 


काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापर्यंत तीन यादी जाहीर केल्या होत्या. यातील तिसऱ्या यादीत महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आता काँग्रेसकडून देशभरातील 46 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील 4 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. 



चार जागांवरील उमेदवारांची घोषणा


काँग्रेसने नुकत्याच जाहीर केलेल्या यादीत नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली-चिमुर, रामटेक या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. यात रामटेकमधून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नागपूर मतदारसंघातून विकास ठाकरे निवडणूक लढणार आहे. तसेच गडचिरोलीमधून नामदेव किरसान यांना तिकीट मिळालं आहे. त्यासोबतच भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


यापूर्वी काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवळ पडवी, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजीराव काळगे आणि सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती.