Dhairyasheel Mohite Patil Resignation : लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर आलेली असताना आणि अनेक पक्ष आता उमेदवार यादी जाहीर करण्याच्या अखेरच्या टप्प्यात असतानाच राज्याच्या राजकारणा मोठे उलटफेर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मातब्बर राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांनीही राजकीय डावपेच साधत आता आपल्या गटाची ताकद वाढवल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देत (Maratha Reservation) मराठा कार्ड खेळणाऱ्या पवारांच्या साथीला आता माढा मतदारसंघही येण्याची चिन्हं आहेत. कारण, त्यांच्या गटाशी आता धैर्यशील मोहिते पाटील हे नाव जोडलं जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप (BJP) नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकताच पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. इतकंच नव्हे, तर त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याचं वृत्तही आता समोर आलं असून, 14 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (NCP Sharad Pawar Group) गटामध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ज्यामुळं आता शरद पवारांनी खऱ्या अर्थानं माढ्य़ात भाकरी फिरवली असून, येत्या काळात धैर्यशील मोहिते पाटील हेच माढा लोकसभा मतदारसंघाचे (Madha Loksabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील ही माहिती मिळत आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा 



राजीनामा देत काय म्हणालेय धैर्यशील मोहिते पाटील?


पक्षातील मंडळ कार्यकारिणी, मोर्ता, प्रकोष्ठ अशा संघटनात्मक रचना गठीत करून कार्यान्वित करण्याचं काम आपण केल्याचं सांगत आपण विविध कामं जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याची बाब मोहिते पाटील यांनी अधोरेखित केली. पक्षाकडून आपल्यावरील विश्वासासंदर्भातही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यादरम्यान त्यांनी आपण काही वैयक्तिक कारणास्तव भाजपमधील सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.