EVM Machine Hack call: देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे.  ईव्हीएम मशिनच्या माध्यमातून हे मतदान केले जाते. त्यामुळे लोकशाहीची सारी भिस्त या ईव्हीएम मशिनवर अवलंबून आहे. ईव्हीएम हॅक होऊ शकते असा आरोप विरोधकांकडून केला जातो. पण विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे यांना धक्कादायक अनुभव आलाय.  याची कहाणी त्यांनी सांगितली आहे. काय म्हणाले दानवे? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक व्यक्ती मला सारखा फोन करून इलेक्शन मॅनेजमेंट करता येते असं सांगत होता. आपण भारतीय सैन्यात मेजर असल्याचे देखील सांगत होता. ईव्हीएम मॅनेजमेंट करतो सांगितल्याने नातेवाईक किंवा जवळच्या व्यक्तींच्या मतामध्ये जास्तीत जास्त परिवर्तन करेल असा माझा समज होता. मॅनेजमेंट म्हणून मी त्या गोष्टीमध्ये लक्ष दिल्याचे दानवे म्हणाले.


इलेक्शन काळातली गोष्ट असल्यामुळे मी दुर्लक्ष केलं. पण सारखे कॉल येत असल्यामुळे मी मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय हे बोलण्याचं ठरवलं. त्याच्याशी बोललो तेव्हा मला धक्काच बसला. त्याने मला सांगितलं की मी ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो. माझ्याकडे चीप आहे. सर्वच्या सर्व मतदान केंद्रावर तसं करता येईल. जसं पाहिजे तसं मतदान इथे नाही तर कुठेही करू शकतो असे तो सांगत होता.


मात्र, या गोष्टी शक्य नाही. आपल्या डेमोक्रोशीमध्ये अनेक यंत्रणा आहे. त्यामध्ये कुठे ना कुठे या गोष्टी अडकत असतात. असं काही असल्यास कुणी ना कुणी अधिकारी सांगतोच की असं होतंय. सर्वच अधिकारी निवडणूक आयोग आणि सत्ताधिकार्‍यांना बांधलेले नाहीत, आमच्याही विचाराचे लोक असतात. त्यामुळे या गोष्टी होऊ शकत नाही असं मला ठाम विश्वास होता. 


तरी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण एखाद्या माणसाला जीवनातून उठवणे योग्य नाही. तरीदेखील तो माझ्या मागे लागल्यानंतर मला त्याने ऑफर दिली. मला अडीच कोटी द्या, असे तो म्हणाला. मी अडीच कोटी कुठून देणार मी अडीच लाख देऊ शकत नाही, असे त्याला दानवेंनी सांगितले. मात्र त्याचं सतत हे चालू असल्यामुळे मी पोलीस आयुक्तांना फोन करून माहिती दिली. त्यांनी काही अधिकारी माझ्याकडे पाठवले माझी आणि त्यांची चर्चा झाली. 


त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आमचा दीड कोटीत व्यवहार ठरला. माझ्या भावाच्या माध्यमातून एक लाख रुपये देण्याचे ठरले. त्यावेळी पोलिसांनी त्याला ट्रॅप करून पकडले आणि अटक केली. माझा उद्देश त्याला अटक करणे त्रास देणे नाही तर जनतेमध्ये ईव्हीएम मशीन बद्दल जनजागृती व्हावी एवढाच आहे. अशा पद्धतीने कोणी सांगत असेल तर त्याला पोलिसाच्या ताब्यात द्या, असे आवाहन दानवेंनी केले. 


पाहिजे देशाच्या लोकशाहीसाठी निवडणूक विभागाने यंत्रणा ठेवली असेल तर त्याच्यावर विश्वास निर्माण करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. बॅलेट होता तेव्हा देखील आपण यंत्रणेला नाव ठेवलं होतं, अटल बिहारी त्यावेळेस बाईचा चमत्कार की शाईचा चमत्कार म्हणत होते. प्रत्येक गोष्टीत गुणदोष असतात पण जी व्यवस्था आता आहे त्याच्यावर विश्वास निर्माण करणे आपल्या सर्वांचे काम आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.