Raj Thackeray Target Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या कणकवली येथील प्रचारसभेतून विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाने तुमची अडीच वर्षे मान्य केली असती. तर तुम्ही आज बोलला नसतात. कारण ती गोष्ट हिरावून घेतली म्हणून आग लागली. त्यावेळी सत्तेचा बोळा कोंबला असता, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.कोकणतील उद्योगधंदे गुजरातला चालले याबद्दल तुम्ही बोलला. राज्यातील साडे सात वर्षे उद्धव ठाकरे सत्तेत होते. तेव्हा का बोलला नाहीत? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार सहकार्य करणार, असा टोला त्यांनी लगावला. सध्या अनेक अणुउर्जा प्रकल्प भारतात आहेत. पण स्फोट झाला तर काय होईल याची भीती कोकणाला दाखवली जाते. कोकणात प्रकल्प येऊ द्यायचा नाही. यांचा खासदार नाणारला विरोध करणार आणि लोकांना भडकवणार, असा टोला त्यांनी लगावला.नाणारमध्ये जमिन घेतल्या आहेत त्या कोणी घेतल्या? यांनी नाणारला विरोध केला. मुख्यमंत्री झाल्यावर बारसूत प्रकल्प हलवायचं म्हटले. तेथे 5 हजार एकर जमिन सापडली म्हणाले. म्हणजे कोणीतरी घेऊन ठेवली होती. यांच्याच लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या. सरकार जास्त पैसे देतं, असा आरोप त्यांनी केला. 


पहिल्यांदा प्रकल्प थांबवायचा आणि जमिनीच्या किंमती वाढवायच्या. हे इथल्या खासदाराचे धंदे असल्याचे राज ठाकरे म्हणाले. या कोकणात चांगले प्रकल्प यावेत ही प्रत्येकाची इच्छा आहे. अख्खं जग गोव्यात जातं. कोकणात इंग्लिश स्पिकिंग कोर्स आणा, असे आवाहन त्यांनी नारायण राणेंना केले. नारायण राणे मुख्यमंत्री झाले तेव्हा मला प्रश्न पडला होता. पण त्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद हाकलं ते भल्या भल्यांना जमलं नाही. कोकणासाठी जे काही तुम्हाला वाटतं ते करु शकणारा माणूस फक्त नारायण राणे आहे,असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.