कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी: महाराष्ट्रात महाविकास आघाडीला खूप चांगलं वातावरण असून पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जवळपास सर्वच जागा जिंकेल असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे राऊत यांच्या हस्ते पिंपरीमध्ये उद्घाटन झाल, त्यावेळेस ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात काँग्रेसचे उमेदवार धंगेकर हेसुद्धा निवडून येतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी दमदाटी करण्याचे काम सुरू आहे, पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली. 


महाराष्ट्रात मोदी यांनी प्रत्येक मतदार संघात घर घेतले का? असं चित्र आहे. महाराष्ट्रातील 48 जागा देशात परीवर्तन घडवू शकतील अशी त्यांना भीती आहे, म्हणून ते महाराष्ट्रात आहेत, पण मोदी येवू देत नाही तर अमित शाह येवू द्या महाविकास आघाडी 35 हुन अधिक जागा निवडून आणेल असा विश्वास आम्हाला असल्याचे ही राऊत म्हणाले.


गद्दारीची कीड आत्ताच नष्ट करायची आहे. त्यासाठी गद्दारी केलेल्या सर्वांना पाढायचा मुख्य हेतू महाविकास आघाडीचा आहे असेही राऊत म्हणाले. नांदेडमध्ये सुद्धा भाजप पराभूत होईल असा दावा राऊत यांनी केला. सुप्रिया सुळे यांचा विजय विक्रमी मतांनी होईल असं सांगतानाच आमदार खासदार गेले तरी मतदार जागेवर आहे आणि त्यामुळे मावळ जिंकू अस ही ते म्हणाले.


निवडणूक आयोग हा भाजपची शाखा असल्याची जोरदार टीका ही त्यांनी केली. गेली 10 वर्ष ती खासगी संस्था झालीय, आचारसंहिता असताना कोणी पंतप्रधान नसते, पण पंतप्रधान सरकारी यंत्रणांचा वापर प्रचारासाठी करत आहेत हा आचारसंहिता भंग आहे अशी टीका ही त्यांनी केली. 


प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजप वाढवली , पूनम महाजन यांची उमेदवारी कापणे म्हणजे प्रमोद महाजन यांची लिगसी कपण्यासारखे असल्याचे राऊत म्हणाले. मावळमध्ये अजित पवार प्रचार करतायेत ते बारणे यांना पाडतील, असं राऊत म्हणाले. पार्थ पवार यांचा पराभव करणाऱ्या बारणे यांचा प्रचार अजित पवार करणार या वर बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. बारामतीत नवरा आणि मावळ मध्ये वडील प्रचार करतायेत दोन्ही ठिकाणी पराभव होईल असा दावा त्यांनी केला.