Shiv Sainiks Stopped Narayan Ranes Campaign: रत्नागिरीत भाजप उमेदवार नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेले शिवसैनिक पुन्हा एकदा थांबल्याची बातमी समोर येत आहे. प्रचारासाठी छापून आलेल्या पत्रकावर बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचा फोटो नसल्याने आता प्रचार करणे शिवसैनिकांनी थांबवले असल्याची माहिती मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे निवडणूक लढवत आहेत. आधीच उमेदवार घोषित होण्यास वेळ झाला होता. उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अपेक्षेत शिवसैनिक होते. मात्र अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यावर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. 


ही नाराजी दूर करण्याचे काम मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून केले जात होते. आता कुठे या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर चक्क बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचाच फोटो नसल्याने शिवसैनिकांनी आता प्रचार थांबवला असल्याची माहिती मिळत आहे.


उदय सामंतांची प्रतिक्रिया 
मी स्वत: तिथे होतो. असे कुठे झाले नाही. सर्व शिवसैनिक जीव ओतून काम करत आहेत. महायुतीच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी विरोधकांकडून हा संभ्रम पसरवला जात असल्याचे उदय सामंत म्हणाले.