Vinod Patil Angry: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. यानंतर काही प्रमाणात नाराजीदेखील समोर येत आहे. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला.  शिवसेना शिंदे गटाकडून छत्रपती संभाजीनगर येथून संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. येथून विनोद पाटील हे इच्छुक होते. भुमरेंची उमेदवारी जाहीर केल्यास काही तास उलटले नाहीत तोवर विनोद पाटलांची नाराजी समोर आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजी नगरात शिवसेनेने संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यामुळं इच्छुक विनोद पाटील मात्र नाराज झाले आहेत. यानंतर विनोद पाटील यांनी थेट आरोप केले आहेत. 2 आमदार आणि एक राज्यसभेचे खासदारांनी माझं तिकीट कापल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केलाय.



आता माघार नाही 2 दिवसात जनतेत जाऊन निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितलाय.. विनोद पाटलांच्या या भूमिकेने शिवसेनेची मात्र आता संभाजीनगर चांगलीच गोची होणार असं दिसतंय.


भुमरेंना तिकीट


मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे. त्यानंतर आज शिवसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरुन भाजप आणि शिवसेनेतील वाद अखेर संपुष्टात आला आहे. तसेच यामुळे पक्षांतर्गत कुरबुरी सुरु असल्याच्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे. 



छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि शिवसेना या दोघांनीही दावा सांगितला होता. भाजपकडून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी करत होते. तर दुसरीकडे शिवसेनेतील बंडानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे यांनीही लोकसभेची तयारी केली होती. विशेष म्हणजे भाजपने दोन वर्षात पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभाही घेतल्या होत्या. मात्र अखेर भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटाला छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघ दिला आहे. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी घोषित  करण्यात आली.