Loksabha Election 2024: सध्या राज्यासह देशात निवडणुका सुरु आहेत. प्रत्येक मतदार मतदान केंद्रात जाऊन आपल्या आवडत्या नेत्याला, पक्षाला मत देतोय. तुम्ही मतदान करायला गेलात, मतदान केंद्राच्या यादीत तुमचे नाव पाहताय आणि तुमच्या नावाचे मतदान आधीच झालंय, असं तुम्हाला कळालं तर? धक्का बसेल ना? असाच प्रकार  पुण्यात राजगुरुनगर येथे झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय..मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करुन स्वाक्षरी केल्याचा प्रकार घडलाय. प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदाराने बोगस मतदान होत असल्याचा प्रकार उघड केला आहे. 


राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील मतदान केंद्रात धक्कादायक प्रकार घडला. मतदान केंद्रात बोगस मतदानामुळे गोंधळ उडाला. त्यामुळे  अमोल कोल्हेंच्या प्रतिनिधींनी केंद्र प्रमुखांना जाब विचारला. बोगस मतदान होत असल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासन, निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा शंका उपस्थित होतेय.


Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद