Raigad NCP: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यानंतर सर्व नेते, कार्यकर्ता आपला पक्ष आणखी वाढवण्याच्या तयारीला लागले आहेत. राज्यात वरिष्ठ पातळीवर युत्या, आघाड्या होत आहेत. तर स्थानिक पातळीवर इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रवेश करुन घेतला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि शिवसेनेत उभी फूट पडल्याने आगामी निवडणुकीची चूरस आणखी वाढली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट राज्यातील विविध मतदार संघात आपला पक्ष बळकट करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. याचीच प्रचिती रायगडमध्ये दिसून आली आहे. काय घडलंय रायगडमध्ये? जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी रायगडमधील शेतकरी कामगार पक्षाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची खिल्ली उडवण्यात आली होती. तुमची अवघी 'अडीच हजार मते' असे त्यांना हिणवण्यात आले होते. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने याचा बदला घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षालाचं मोठं खिंडार पाडलंय. शेकापच्या हजारो कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे, धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केलाय. यानंतर धनंजय मुंडेंनी शेकापला आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय.


अलिबाग मतदार संघात तुमची अडीच हजार मतं आहेत. तुम्ही इकडं यायची गरज नाही. ती आम्ही तुमच्या कार्यालयात बैठक घेवून मिळवू अशी चेष्टा मागील निवडणुकीत शेकाप नेत्यांनी केली होती. सुनील तटकरे यांनी हा राग मनात ठेवला होता. या निवडणुकीत शेकापला खिंडार पाडून त्याचं उत्तर दिलं. यावेळी धनंजय मुंडे यांनी शेकापवर टीका केली. आमच्या अध्यक्षांची तुम्ही अशी चेष्टा करत असाल तर इथून पुढच्या काळात तुमची जिल्ह्यात देखील ताकद राहणार नाही, असा सूचक इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रचार प्रमुख धनंजय मुंडे यांनी शेकापला दिला. 


दिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, 'मला फक्त...'


मुरुड तालुक्यात राष्ट्रवादीने शेकापला मोठा धक्का दिलाय. शेकापचे जिल्हा सहचिटणीस मनोज भगत यांच्या नेतृत्वाखाली मुरुडमधील शेकाप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यामुळे मुरुडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अजित पवार गटाची ताकद वाढली आहे.