Eknath Khadse : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 100 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातून अनेपक्षित नावांची घोषणा करण्यात आली आहे. रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून  रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सुनबाईपुढे सासरे माघार घेण्याच्या तयारीत असल्याची राजकीय वर्तुळात रंगली आहे. रावेरमधून  लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून रावेर लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. रावेरमधून एकनाथ खडेस यांचे नाव चर्चेत होते. मात्र, प्रकृतीचे कारण देत एकनाथ खडसे यांनी   रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास एकनाथ खडसे यांनी नकार दिल्यामुळे   राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या मतदार संघात कोणला उमेदवारी देणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


बहुचर्चित रावेर लोकसभा मतदारसंघात खडसे विरूद्ध खडसे लढत होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. प्रकृतीच्या कारणानं आपण निवडणूक लढवणार नसल्याचं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय. तसंच मुलगी रोहिणी खडसेही निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे भाजप उमेदवार रक्षा खडसे यांना घरातून आव्हान मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. रावेरची जागा राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे आहे. पवारांनी रावेर लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची बैठक घेतली. उद्यापर्यंत उमेदवार ठरवण्यात येईल अशी माहिती खडसेंनी दिली. 


रक्षा खडसे यांना भाजपकडून तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी


मला तिसऱ्यांदा संधी दिल्याबद्दल आमच्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मी आभार मानते. नक्कीच या सर्वांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे. त्याला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही, यापेक्षाही चांगलं काम संघटनेसाठी आणि जनतेसाठी माझ्याकडून करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार असून मला माझ्या पक्षावर पूर्णपणे विश्वासही होता मला पक्षाकडून खूप सहकार्य देखील झालेला आहे जनतेने देखील सहकार्य केलेला आहे आणि हे सर्व श्रेय जनतेला आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देते. अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेचे तिकीट जाहीर झाल्यानंतर दिली आहे.