सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसनेनं खासदार उदयनराजे भोसलेंना ऑफर दिली आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे छत्रपती म्हणून लढले तर साताऱ्याची जागा बिनविरोध करू, पण ते राष्ट्रवादी पक्षाकडून लढले तर शिवसेना त्यांच्याविरोधात लढणारच असल्याची भूमिका शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी साताऱ्यात मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी उदयनराजेंना भेटून तुम्ही छत्रपती म्हणून उभे राहिलात, तर तुमच्याविरोधात कोणीच उभं राहिलं नाही पाहिजे, असं मत व्यक्त केलं असल्याचंही दिवाकर रावते म्हणाले. यावेळी भाजपा शिवसेना युतीबाबत विचारले असता त्यांनी युतीबाबत पक्षाची भूमिका काय आहे ते उद्धव ठाकरे लवकरच मांडतील असं सांगितलं. तसंच घोडा मैदान जवळ आहे, त्यामुळे जास्त वाट बघावी लागणार नसल्याचंही दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत रावते बोलत होते.


साताऱ्यातून उदयनराजेंनाच उमदेवारी?


साताऱ्यातून उदयनराजे भोसलेंना तिकीट देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विरोध होता. पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेस साताऱ्यामधून उदयनराजे भोसलेंना उमदेवारी देणार असल्याचं बोललं जातंय. 


'शरद पवार माढातील उमेदावर'