शिर्डी : राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पूत्र सुजय विखे पाटील हे नगर दक्षिणची लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला तयार नसल्यामुळे तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान सुजय विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात पंज्याला मतदान करा, दक्षिणेत चिन्ह तुम्हाला लवकरच सांगतो, असं वक्कव्य करुन सस्पेन्स कायम ठेवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु असून राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आहे. दोन्ही काँग्रेस एकत्र लढणार असल्याने अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात मोठा तिढा निर्माण झाला आहे.


नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडचे राहणार असल्याचं नगर दौऱ्यात अजित पवरांनी स्पष्ट केल्यामुळे विखेंची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील आता कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी सुजय विखे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. पण मी भाजपात जाणार नसल्याचं सुजय यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सुजय विखे-पाटील काय भूमिका घेतात, याकडे नगरकरांचं लक्ष लागलं आहे.