बीड लोकसभेचा निकाल अखेर जाहीर, बजरंग सोनवणेंचा पकंजा मुंडेंना धक्का
Beed Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बीड लोकसभा मतदारसंघाकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर बीडचा निकाल हाती आला आहे. पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय.
Beed Loksabha Election Results 2024 : बीडमधील हायहोल्टेज ड्रामामध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांचा विजय झाला आहे. भाजपच्या पंकजा मुंडेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. ही लढत अतिशय अटीतटीची झाली. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शरद पवार यांनी पोलिसांना हस्तक्षेप करण्याचं आवाहनही केलं होतं. पण अखेर रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक लढतीत बजरंग सोनावणे यांचा विजय झाला.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी 68,1569 मतांनी विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे यांनी 22 व्या फेरीपर्यंत तब्बल 38 हजार मतांची आघाडी घेतली होती, मात्र शेवटच्या काही निर्णायक फेऱ्यांमध्ये सोनावणे यांनी मुसंडी मारली. पण त्यानंतर मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला. शेवटच्या फेरीत पंकजा मुंडे यांना 67,4984 मतं मिळाली. बीडमध्ये सोनावणे यांनी 6,585 मतांनी विजय मिळवलाय.
तर पकंजा मुंडेंचा हा पराभव त्यांच्या राजकीय प्रवासासाठी धक्का तर आहेच शिवाय भाजपसाठीही हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. अतिशय चुरसीच्या लढतीत बीडची जागा शरद पवार राष्ट्रवादीच्या गटाकडे गेली आहे.