Maratha Reservation : संभाजीराजे यांचा सरकारला इशारा, `समाजाने यासाठी तयारीला लागावे`
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी रायगड ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे.
अलिबाग : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी रायगड ते मुंबई लाँग मार्च काढण्यात येणार आहे. याबाबत खासदार संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी इशारा दिला आहे. संभाजी राजे हे रायगडमधून जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. (Long march for Maratha reservation - Sambhaji Raje )
मराठा समाजाने लाँगमार्चच्या तयारीला लागावे, असे आवाहन संभाजी राजे यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांवर सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आता मराठा समाजाने पुणे ते मुंबई लाँगमार्च काढण्याची तयारी करावी, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षण जनसंवाद दौरा हा रायगड जिल्ह्यातून करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यास उत्साहात सुरुवात केली. खोपोली येथे संभाजी राजे यांचे स्वागत केले. तसेच पळसदरी येथे तरूणाईसह माता भगिनींनी अत्यंत उत्साहात स्वागत केले.
तर मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यात खोपोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून संभाजी राजे यांनी अभिवादन केले. राजर्षि शाहू छत्रपती महाराजांनी आरक्षण देत असताना ठेवलेला व्यापक दृष्टिकोन ध्यानी घेऊनच डॉ. बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद केली, अशी माहिती संभाजी राजे यांनी दिली.