अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडली
तब्बल साडेचार हजार क्विंटल म्हणजे जवळपास अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय.
नांदेड : तब्बल साडेचार हजार क्विंटल म्हणजे जवळपास अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय. शहरातील नवा मोंढा भागात वखार महामंडळाचं गोडाऊन आहे. यात नाफेडमार्फत खरेदी केलेली आणि काही शेतक-यांची खासगी स्वरुपात खरेदी केलेली तूर आणि अन्य धान्य ठेवण्यात आलं होतं.
19 ऑगस्टला नांदेड परिसरात मोठा पाऊस झाला. या पावसात वखार महामंडळाच्या चार गो़डाऊनमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं, साडे चार हजार क्विंटल तुर, 200 क्विंटल हळद आणि 150 क्विंटल सोयाबीनची नासाडी झालीय.