शिर्डी : नऊ महिन्यांच्या बाळाला शिर्डी येथे साई मंदिरात सोडून पोबारा करणारी माता अखेर सापडली आहे. ३१ मे रोजी महिलेने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला साईमंदिरात सोडून पळ काढला होता. प्रेमप्रकरणात मुलीला जन्म दिला आणि त्यामुळे बाळाला सोडून दिल्याची कबुली तिने दिली आहे. चिमुकलीला साईमंदिरात सोडून पळ काढला होता. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली होती. तेव्हापासून पोलीस या निर्दयी मातेचा शोध घेत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिमुकलीला साई मंदिरात सोडून जाणारी आरोपी महिला ही जळगाव जिल्ह्यातील कडोली गावाची रहिवासी आहे. बाळाला सोडल्यानंतर दोन दिवसांनी ती पुन्हा साई मंदिरात हजर झाली होती. प्रेमप्रकरणात मुलीला जन्म दिला आणि यामुळे बाळाला सोडून दिल्याची कबुली तिने दिली आहे. ३१ मे रोजी साई मंदिरात भरगर्दीत बाळाच्या रडण्याचा आवाज आला. मात्र, या बाळाजवळ कोणीही आले नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शोधाशोध करूनही या बाळाची माता सापडली नव्हती. अखेर सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला असता एका महिलेने बाळाला सोडून पळ काढल्याचे निष्पन्न झाले होते.


काल रात्री ती महिला पुन्हा मंदिर परिरातील कार्यालयात मुलीची चौकशी करु लागली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तिची चौकशी केली असता तिने आपली कर्मकहाणी पुढे सांगितली. माझे लग्न झाले. त्यानंतर मला मुलगा झाला. मात्र नवरा दारु पिऊन त्रास देत असल्याने तिने नवऱ्याला सोडून आपल्या मामाकडे राहणे पसंत केले.


यादरम्यान तिचे एका व्यक्तीशी प्रेमसबंध जुळले. त्यानंतर तिला ही मुलगी झाली. मात्र या मुलीला पहिला पती आणि प्रियकर दोन्ही स्विकारण्यास तयार नसल्याने तिने मुलीला साई मंदिरात आणुन सोडले. अशी माहिती तिने चौकशीत सांगितली. दरम्यान, या महिलेने आपल्या मुलीस घेवून जाण्यास नकार दिला आहे. तिचे चांगले संगोपन केल जावे, अशी तिने आपली अपेक्षा व्यक्त केली आहे.