LPG Cylinder Price Update : महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अगदी अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून (Petrol-Diesel Price) खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढ जात आहे. त्यातच आता गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) वाढत्या दराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलिंडर स्वस्त होणार की किंमत वाढणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अशा परिस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरच्या दराबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. दरम्यान पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, एटीएफ, केरोसीन तेल इत्यादींच्या किंमतींचा आढावा घेत त्यात बदल करतात. त्यानुसार मे महिन्याच्या सुरुवातीलाच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणते बदल झाले आहेत जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 मे 2023 (maharashtra day 2023) ला पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण केली आहे. परिणामी ग्राहकांसाठी खास करुन स्वयंपाक घरात काम करणाऱ्या गृहिणींसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सलग दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅसच्या दरात (LPG Cylinder Price) कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. घरगुती गॅस सिलिंडपच्या किंमती जैसे थे ठेवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 171.50 रुपयांनी कमी केली आहे. 


वाचा : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, 1 लीटरसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये


यामध्ये देशातील काही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत गॅस सिलिंडरचे दर 171.5 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 1856.50 रुपये, तर कोलकात्यात 1960.50 रुपये आणि मुंबईत 1808.50 रुपये झाला आहे. त्याचबरोबर चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडर 2021.50 रुपयांना उपलब्ध होणार आहे. 


सलग दुसऱ्या महिन्यात दिलासा 


सलद दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दराबाबत दिलासा देणार बातमी समोर येत आहे. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला गॅसच्या किमतीत बदल करतात. 1 एप्रिल 2023 रोजीही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी झाली असून गॅस सिलिंडर सुमारे 92 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 


पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर


आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल नाही. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 22 रोजी रोझी उत्पादन शुल्कात कपात झाली असती. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे पेट्रोलचे दर 9.5 रुपयांनी आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले असते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होत असतानाही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.