अहमदनगर : जामखेड खर्डा रोडवरील शिऊर फटा येथे ट्रक आणि हैदराबाद येथील साई भक्तांना घेऊन जाणाऱ्या लग्झरी बसचा पहाटे ४ वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण जखमी असल्याचं समजतय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची माहिती समजताच भर पावसात सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


यवतमाळमध्ये अपघातात १० ठार


यवतमाळच्या कोसदनी घाटात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात १० भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय. ट्रक आणि कारची नागपूर तुळजापूर मार्गावर समोरासमोर धडक झाली.


हा अपघात इतका भीषण होता की कारमधील १० भाविकांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील भाविक पंजाब राज्यातील होते. नांदेड येथे दर्शनासाठी जात असताना अपघात झाला.