Madha Lok Sabha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले मोहिते-पाटील यांनी आता भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. माढ्यातील (Madha Loksabha) हेवीवेट कुटूंब असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने एका मताने लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता मोहिते पाटील समर्थक धैर्यशील मोहिते (Dhairyasheel Mohite Patil) यांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रही होते, महत्वाचे म्हणजे आज नाराज मोहिते-पाटिल आणि शिरूरचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची आज भेट झाली असून दोघांमध्ये ही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सुत्राकडून मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वात थ्रिलर अशा जागेवर पिक्चर अभी बाकी है, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माढा लोकसभेच्या जागेवरून महायुतीत अद्यापही तिढा कायम दिसत असून भाजपने विद्यमान खासदार रणजीतसिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) यांनाच पुन्हा उमेदवार जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचा गट नाराज झाला होता. आता मोहिते पाटील लवकरच शरद पवार गटात येतील, अशा चर्चेला आता उधान आलं असून मोहिते पाटील काय निर्णय घेतात? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 


जयसिंह मोहिते पाटील म्हणतात...


आम्ही मोहिते पाटील कुटुंबाने एका मतानं ठरवलं आहे की, लोकसभा निवडणूक लढायची आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील. माढा , सोलापूर, बारामती मतदारसंघात आमच्या निर्णयाचा परिणाम दिसेल. आम्ही मतदारसंघात चाचपणी करून हा निर्णय घेतला. भाजप वरिष्ठ नेत्यांना समजलं पाहिजं खरी ताकत कुठं आहे. भाजपच्या 28 पेक्षा अधिक जागा निवडून येणार नाहीत. सध्या भाजपमध्ये अवाक सुरू आहे. पण भाजपमधून बाहेर पडायची सुरुवात आम्ही करत आहोत. प्रवेशाची तारीख लवकरच ठरवू, असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, रणजीतसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहित पाटील यांनी दंड थोपटले होते. आता मोहिते पाटील यांनी भाजपविरुद्ध बंडखोरी केली तर फलटणचे अजित गटातील नेते रामराजे नाईक-निंबाळकर कोणता निर्णय घेणार? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.