पुणे : पुणे सार्वजनिक मंडळाचे यंदाचे १२५ वे वर्ष आहे. हे औचित्य साधून पुण्याच्या पहिल्या मानाच्या समजल्या जाणार्‍या कसबा पेठ गणपतीची महाआरती करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मराठीतील नामवंत १२५ कलाकारांनी एकत्र येऊन कसबा गणपतीची महाआरती केली. या कार्यक्रमामध्ये तरूण नवोदित गायक, कलाकारांसमवेत अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.  महाआरतीनंतर कलाकारांनी अथर्वशीर्षाचेही पठण केले आहे.



 


ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, अभिनेता राहूल सोलापूरकर,गायक आनंद भाटे समवेत आर्या आंबेकर यांचा समावेश होता. या कार्यक्रमामध्ये कलाकारांच्या सोबतीने पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट ,महापौर मुक्ता टिळक यादेखील उपस्थित होत्या. 




महाआरतीच्या वेळेस कलाकारांनी पारंपारिक वेशभूषा करत डोक्याला फेटा बांधला होता. यानंतर महापालिकेच्या वतीने स्मृतीचिन्हे देऊन या सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. पुणे महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून ही महाआरती पार पडली.