महा NGO फेडरेशनकडून भिक्षेकऱ्यांची दिवाळी गोड - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महा एनजीओ फेडरेशनकडून क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या सी एसआर अंतर्गत भिक्षेकऱ्यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिवाळी फराळ वाटप
Aatmanirbhar Diwali 2022 : आत्मनिर्भर दिवाळी अंतर्गत महा एनजीओ फेडरेशन ( Maha NGO Federation ) यांच्यावतीने क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लि.यांच्या सीएसआर अंतर्गत ५००० कुटूंबांना दिवाळी फराळ वाटप (Diwali Faral) करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत पुणे येथील शेकडो भिक्षेकरुना पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) यांच्या शुभहस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून सदर उपक्रम संपन्न झाला.
डॉ. अभिजित सोनावणे यांनी सदर कार्यक्रमाचे संयोजन केले होते. भिक्षेकरी यांचे पुनर्वसन या महत्वाच्या विषयावर पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी सकारत्मक रित्या विचार करत येत्या काळात यावर महा एनजीओ फेडरेशन सोबत एकत्रित येत यावर काम करण्याची तयारी दर्शवली. समाजातील या दुर्लक्षित घटकाकडे सर्वांनी आदराने पाहावे या भावनेतून सदर उपक्रम संस्था करत आहे. वाईट कोणच नसते परिस्थिती वाईट बनवते. भिक्षेकरींना दिलेली आपुलकी आणि सेवा या माध्यमातून अनेक रस्त्यावर भीक मागणारे लोक आज छोटा चहा विकणे, फुले विकणे, वजनकाटा असा व्यवसाय करत आहेत.
कृष्णकुमारजी बुब यांचे विशेष सहकार्य यास लाभले. शेखर मुंदडा यांच्या संकल्पनेतून महा एनजीओ फेडरेशन या घटकासोबत सदैव सेवेसाठी तत्पर आहे अशी माहिती कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले यांनी दिली. यावेळी महा एनजीओ फेडरेशन संचालक समिती सदस्य मुकुंद शिंदे, गणेश बाकले, अमोल उंबरजे, सौ. प्रणिता जगताप, उद्योजक योगेश बजाज , महेश सोनी व सोहम ट्रस्टच्या डॉ. मनीषा सोनावणे व सहकारी उपस्थित होते.