PWD Job 2023:  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये शिपाई, ड्रायव्हर, सहाय्यक ते इंजिनीअर अशी अनेक पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु होत असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात एकूण 2 हजार 109 पदे भरली जाणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब अराजपत्रित) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी परीक्षा उत्तीर्ण  असणे आवश्यक आहे. यासोबत त्यांच्यातडे तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका असणे आवश्यक आहे. ज्युनिअर इंजिनीअर (विद्युत) (गट- ब अराजपत्रित) पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण तसेच त्याच्याकडे विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाचा डिप्लोमा असावा. कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट- ब अराजपत्रित) पदासाठी उमेदवार दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा आणि यासोबतच त्यांच्याकडे वास्तुशास्त्राची पदवी असावी.  स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) पदासाठी उमेदवार दहावीसोबत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.


लघुलेखक ( उच्चश्रेणी) (गट- ब अराजपत्रित) उमेदवारांना दहावी परीक्षा उत्तीर्ण, उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 WPM इतका असावा. लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट- ब अराजपत्रि) पदासाठी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असण्यासोबत लघुलेखनाचा वेग किमान 100 WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM असावा. 
उद्यान पर्यवेक्षक (गट-क) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी असावी. 


सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ (गट-क) पदासाठी उमेदवार दहावी/बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा तसेच त्यांच्याकडे वास्तुशास्त्राची पदवी असावी. स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपीक (गट-क) पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) पदासाठी उमेदवार दहावी किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवीधर असावा. 


महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीतून होणार निवड


वाहन चालक (गट-क) पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. स्वच्छक (गट-क) पदासाठी अर्ज करणारा उमेदवार शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेला असावा. शिपाई (गट-क) पदासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 


BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी


18 ते कमाल 55 वर्षापर्यंत वयोमर्यादा असलेले उमेदवार रिक्त पदांसाठी अर्ज करु शकतात.  खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1000 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून 900 रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. 16 ऑक्टोबर 2023 पासून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करु शकतात. 


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा