महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पदवीधरांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीतून होणार निवड
MAHA Security Bharti 2023: कार्यालयीन सहाय्यक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
MAHA Security Bharti 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे. याअंतर्गत कार्यालयीन सहाय्यक पदाची भरती केली जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरल्या जातील.
कार्यालयीन सहाय्यक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षापर्यंत असावे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही.
BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी
कार्यालयीन सहाय्यक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
Railway Job: भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, 'येथे' पाठवा अर्ज
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – 400005 या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. 25 ऑक्टोबर 2023 रोजी ही मुलाखत घेतली जाणार आहे.
पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मध्य रेल्वेमध्ये बंपर भरती
मध्य रेल्वेअंतर्गत महाराष्ट्रात ही भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत एकूण 62 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खेळाडू ग्रुप सीच्या एकूण 21 जागा आणि खेळाडू ग्रुप डीच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी/ आयटीआय/बारावी/पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने संबंधित क्रीडा पात्रता पूर्ण केलेली असावी.
मध्य रेल्वेच्या खेळाडू ग्रुप सी आणि खेळाडू ग्रुप डीच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25 वर्षेांदरम्यान असावे. एससी/एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सवलत देण्यात येणार आहे. याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रात नोकरी करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी उमेदवारांकडून 500 रुपये शुल्क घेण्यात येईल. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्स सर्व्हिसमन/महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 5 हजार 200 ते 20 हजार 200 रुपये पगार दिला जाणार आहे. इच्छुक उमेदवार आपला अर्ज 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत पाठवू शकतात. मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट cr.indianrailways.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.