मुंबई: राज्यात सत्ता आल्यापासून फडणवीस सरकारच्या योजना बंद करण्याचा सपाटा लावलेल्या महाविकासआघाडीकडून भाजपला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. फडणवीस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेली गोवर्धन गोवंश केंद्र योजना लवकरच बंद होणार आहे. भाकड गाई आणि गोवंश संगोपनासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, या योजनेसाठी निधीवाटप करताना निकषांचे पालन होत नसल्याचे कारण देत महाविकासआघाडीने या योजनेचा गाशा गुंडाळण्याचे ठरवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे


दुग्धोत्पादन, शेतीकाम, प्रजनन, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या गाय, वळू,  बैल या गोवंशाचा सांभाळ करणे आणि या पशुधनासाठी चारा, पाणी, निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे, हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. मात्र, आता ही योजना बंद होणार असल्याने भाकड गुरांच्या संगोपनाची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.


ठाकरे सरकारकडून जलयुक्त शिवार योजना बंद


त्यामुळे आता भाजप आक्रमक झाली आहे. केवळ अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी महाविकासआघाडी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. लाचार शिवसेनेने आणखी एक शरणागती स्वीकारली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारची आणखी एक योजना बंद केली. आम्ही याचा तीव्र निषेध करतो, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.