दीपक भातुसे, मुंबई : येत्या १ डिसेंबर रोजी होणार्‍या विधानपरिषदेच्या ५ जागांची निवडणूक महाविकास आघाडीतील पक्ष वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अर्ज भरण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीत या जागांच्या वाटपाची चर्चा झालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- अमरावती शिक्षक मतदार संघातील  सद्य आमदार श्रीकांत देशपांडे यांना शिवसेनेच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे. पण त्याला काँग्रेसचा विरोध आहे. स्थानिक काँग्रेसकडून वेगळा उमेदवार देण्याचा आग्रह आहे. 


- पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छेप्रमाणे उमेदवार द्यावा असा काँग्रेसचा आग्रह आहे. सध्या या जागेवर दत्तात्रय सावंत हे आमदार होते. त्यांना मागील निवडणुकीत काँग्रेसने पाठिंबा दिला होता.


- पुणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादी लढणार असून इथे शिवसेना आणि काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे, इथे भाजपकडून चंद्रकात पाटील आमदार होते.


- औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सतिश चव्हाण पुन्हा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.


- नागपूर पदवीधर मतदारसंघ काँग्रेस लढवण्याची शक्यता आहे.


अर्ज भरायला आता केवळ ४ दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीत जागा वाटपाची अद्याप चर्चा झालेली नाही. या चार दिवसात चर्चेतून मार्ग निघतो का ते बघावे लागेल.