पावसामुळे महाबळेश्वरमधील वेण्णालेक तुडुंब
गेल्या आठ दिवसात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत 1167 मिमी पावसाची नोंद झालीय.
सातारा : गेल्या आठ दिवसात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत 1167 मिमी पावसाची नोंद झालीय.
या पावसामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णालेक पूर्ण भरला असून बोटींग करणा-या पर्यटकानीही आनंद लुटला. वेण्णालेक तलाव 110 फुट खोल असून 3 किलोमीटर लांब पसरला आहे.
सध्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या 108 बोटी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्यात. यामुळे पर्यटक बोटींगचा मनमुराद आनंद लुटताहेत.