मुंबई : कोरोना लसीकरणसाठी 18 हजार जणांना प्रशिक्षण द्यायचं काम आता पूर्ण होईल तसेच स्टोरेज साठी कोल्ड चेन व्यवस्था झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्राने मोफत लसीकरण केलं पाहिजे अशी सगळ्या राज्यांची अपेक्षा आहे. असे झाल्यास मोफत लसीकरण शक्य असल्याचे ते म्हणाले. मोफत लस मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. केंद्र सरकार सूचना देईल ती कार्यवाही करु असे ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लस देण्याबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. मायक्रो प्लानिंग तयार असून हेल्थ वर्कर्स डेटा, अत्यावश्यक सेवेतील लोक, 50 वर्षावरील इतर आजार असलेले, 50 वर्षाखालील हा सगळा डेटा तयार करत आहोत असे राजेश टोपे म्हणाले.



लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या व्यक्तीला मेसेज मिळणार, त्यांनंतर त्याची ओळख पटवून त्याला लस दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. 


उत्तर प्रदेशमध्ये मेडिकल स्टाफ सुट्ट्या रद्द केल्या पण आपल्याला तसं काही करायची गरज नाही. आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध असून गरज पडली तर सुट्टी रद्द होईल असे ते म्हणाले. 


लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे. जी काम राज्य सरकारने करायची ते आम्ही करत आहोत. लॉजीस्टिक,डेटा सगळं आम्ही करत आहोत, लसीकरणाच्या परिणाम त्या बाबत एक युनिट तयार केलं आहे. साधारण दोन कंपन्या सिरम आणि भारत बायोटेक लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा असल्याचे ते म्हणाले.


आम्ही लसीकरण कार्यक्रम साठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारी पासून लसीकरण सुरू होईल असे ते म्हणाले. महाराष्ट्रात आरोग्य, पोलीस, अत्यावश्यक कर्मचारी 50 वर्षांवरील असे पहिल्या टप्यात 3 कोटी लोकं येतील असा अंदाज आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला.