मुंबई : राज्यात एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण वाढले असून आजचा आकडा 63 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कालपर्यंत राज्यात 52 कोरोनाबाधित रुग्ण होते. यामध्ये आता 11 रुग्ण वाढले असून त्यातील 10 मुंबईचे तर 1 पुण्याचा असल्याचेही त्यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६३ पैकी १४ लोक हे संसर्गानेतर तर इतर हे बाहेरून आलेले आहेत ही महत्वपूर्ण आणि काहीशी दिलासादायक बातमी देखील आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. परिस्थितीची गैरफायदा कुणीही घेवू नये, राष्ट्रीय भावना महत्वाची असल्याचे ते म्हणाले. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ओळखपत्र पाहून त्यांनाच केवळ लोकल- बसमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


काल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या व्हिडीओ कॉन्फरंसिंगनुसार टेस्टिंग लॅब वाढवण्यात येणार आहेत. सर्व मेडिकल हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग फॅसिलिटी तयार करणार आहोत. यापूर्वी 3 लॅब्स होत्या.  आता 7 लॅब्स असल्याचेही ते म्हणाले. 



गावी जाण्यासाठी लोक रेल्वे स्टेशनवर गर्दी करतायत, त्यांना जावू देण्यासाठी जादा रेल्वे सोडण्याची गरज राजेश टोपे यांनी व्यक्त केली. लोकल बंद करायला हव्यात असे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे मत आहे. गर्दी कमी होत नसेल तर लोकल बंद कराव्या लागतील असेही ते म्हणाले. 


एसीचा वापर कमी करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. कारण थंडीत कोरोनाला पोषक वातावरण मिळू शकते. कडक ऊन्हाच्या हवामानात त्याचे आयुर्मआन कमी असते असेही ते म्हणाले.