Nagpur  Priyanka Gandhi Road Show:नागपूरमध्ये प्रियांका गांधींच्या रोड शोमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राडा पाहायला मिळाला. नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने पाहायला आले आहेत. पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका गांधी यांचा रोड शो सुरु आहे. पण भाजपचे कार्यकर्ते बॅरिगेट्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकड्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 'भाजपच्या समर्थकांना मी शुभेच्छा देते पण जिंकणार महाविकास आघाडी.', असे यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या. सकाळपासून या परिसरात तणावाचे वातावरण होते. प्रियांका गांधीची रॅली बडकस चौकात पोहोचली तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवले. यानंतर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते समोर आले. 


हा परिसर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजकडून विरोध करण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण नियंत्रणात राहिले आणि तणाव निवळला आहे.


महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपुरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांनी ‘रोड-शो’ केला.  प्रियंका गांधीं यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत हा रोडशो केला. त्यानंतर मध्य नागपुरात गांधी गेट ते बडकस चौक असाही त्यांचा एक रोड शो झाला.नागपुरातील बडकस चौकातील प्रियंका गांधींच्या रोड शोसाठी लावण्यात आलेले पोस्टर फाडण्यात आले होते.काही भागातील फुगे आणि झेंडेही अज्ञातांकडून काढण्यात आले होते. त्यामुळे राडा होण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती.