मुंबई : नव्या विधानसभेत पाटील आडनावाचा वरचष्मा असणार आहे. कारण यंदाच्या निवडणुकीत विजयी झालेले थोडेथोडके नव्हे तर तब्बल २७ पाटील, विधानसभेत आमदार म्हणून बसणार आहेत. २०१४ च्या विधानसभेत पाटील आडनावाचे २५ आमदार होते. तर १९९९ मधल्या निवडणुकीनंतर आतापर्यंतचे सर्वात जास्त म्हणजे ३८ पाटील आडनावाचे आमदार विधानसभेत बसले होते. विशेष म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंत पाटील आडनावाचे एकंदर ४१५ आमदार झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता, संजय नावाचे १३ उमेदवार विजयी झालेत. विशेष म्हणजे १९८५ मध्ये संजय नावाचा उमेदवार पहिल्यांदाच आमदार झाला होता. त्यानंतर आतापर्यंत संजय नावाच्या आमदारांची संख्या सातत्यानं वाढतच आहे. 


यंदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल २७ उमेदवार पाटील आडनावाचे आहेत. पवार आडनावाचे ८, नाईक ६, शिंदे - ६, देशमुख - ५, चव्हाण - ५, जाधव ४, कदम -३ असे आमदार निवडून गेलेत. २००९ साली पाटील आडनावाचे २५ आमदार विजयी झाले होते. तर १९९९ मध्ये पाटील आडनावाचे तब्बल ३८ आमदार विजयी झाले होते. 



२०१९ मध्ये संजय नावाचे १३ उमेदवार निवडून आलेत. २००४ साली १० संजय, २००९ मध्ये १०, २०१४ मध्ये बारा संजय विधानसभेत होते. 


महाराष्ट्राच्या विधानसभेचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत ४१५ पाटलांनी, १०५ देशमुखांनी, ७८ पवारांनी, ५८ नाईक, ५७ चव्हाण, ५५ जाधव, ५३ शिंदे आणि ४५ कदमांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलंय.


तर यंदाही दिव्यदृष्टी असणारे तेरा संजय आणि २७ पाटील विधानसभेत आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन विकास करा, महाराष्ट्राची पाटीलकी फक्त लय भारी सांभाळा म्हणजे झालं अशीच प्रतिक्रिया सामान्यांतून येत आहे.