गडचिरोली : निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यु झाला आहे. एटापल्ली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बापू पांडु गावडे, (वय 45वर्ष) हे निवडणूक कर्तव्यावर पायी चालून जात असतांना भोवळ येऊन पडले. त्यांचा चंद्रपुर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. बापू गावडे यांना फिट्सचा आजार होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विधानसभा निवडणूकीसाठी एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील बुथवर ते तैनात होते. मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरून पुरसलगोंदी केंद्राकडे पायी जात असतांना गावडे हे भोवळ येऊन पडले. त्यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. 


माञ प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना प्रथम अहेरी आणि तेथून चंद्रपुर येथे हलविण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यापूर्वीही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यावरील एका शिक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला होता.