सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून 'पैलवान' या शब्दावरून विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. आता यामध्ये 'नाच्या' या शब्दाची भर पडली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचार रॅलीत लक्ष्मणराव ढोबळे झेंडा घेवून नाचले होते. त्यांचा नाचतानाच व्हीडिओ चांगलाच व्हायरलही झाला होता. यानंतर मंगळवेढ्यात लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर रॅलीत नाचण्याची वेळ आणल्याची चर्चा मंगळवेढ्यात दबक्या आवाजात सुरू झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंगळवेढ्याच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी ढोबळेंना नाच्या म्हणून संबोधले होते. आपले वय काय, आपण करतोय काय, याचे काहीच भान ढोबळे यांना नसल्याची टीकाही अजित पवार यांनी केली होती. 


या टीकेला लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजितदादा मी माझ्याच पक्षाचा झेंडा घेऊन नाचलोय. तुम्ही कुठे कुठे नाचता हे मला सांगायला लावू नका, असे त्यांनी म्हटले. तसेच अजित पवारांच्या अशा वागण्यामुळे शरद पवार अनेकदा अडचणीत येत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.