मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. लोकांचा कल कोणाच्या बाजुने आहे. याचा अंदाज झी २४ तासने वर्तवला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी युती झाल्यास भाजप-शिवसेनेला तब्बल २२६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर युती न झाल्यास भाजपला १२२ आणि शिवसेनेला ५२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. झी २४ तासनं सगळ्यात आधी राज्यभरातल्या २८८ मतदारसंघातून हे सर्वेक्षण केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युती झाल्यास शिवसेना भाजपला फायदा होताना दिसत आहे. तर युती तुटल्यास दोन्ही पक्षाच्या जागा कमी होतांना दिसत आहेत. तर राष्ट्रवादीला ४५ तर काँग्रेसला ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना २१ जागांचा अंदाज आहे.


शिवसेना-भाजप युती झाल्यास



शिवसेना-भाजप युती न झाल्यास