72 तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे
महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे.. या शपथविधीची सर्वांना उत्सूकता लागलीये.. त्यासाठी आता अवघे 72 तास उरले असून आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू झालीये
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आहे. महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.. यासाठी अवघे 72 तास उरले असून सोहळ्याची जय्यत तयारीही सुरू झालीये.. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरही महायुतीतील नेत्यांची भाऊगर्दी होतंय.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी मैदानातील आसन व्यवस्थेची रचना सुद्धा तयारी झाली आहे. शपथविधीसाठी एकूण 3 स्टेज असणार आहेत. मुख्य मंच 60 बाय 100 फुट असेल. उजव्या आणि डाव्या बाजुला 60 बाय 50 चे दोन मंच आहेत. उजव्या बाजपुच्या मंचावर संत - महंत , सन्मानीय व्यक्ती असतील तर डाव्या बाजुला महापुरुषांच्या प्रतिमा असतील. 30 ते 40 हजार आसनव्यवस्था असेल. मंचासमोर आमदार-खासदार, निमंत्रीत, व्हिव्हीआयपी तसेच चोख पोलिस बंदोबस्त असेल. सर्वसामान्यांच्या प्रवेशाकरता 3 प्रवेशद्वार असतील.
शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याच्या तयारीसंदर्भात भाजपकडून नियोजन बैठकीसह आझाद मैदानातील तयारीची पाहणी सुद्धा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.
शपथविधीची तारीख जवळ आली असताना सुद्धा भाजपकडून विधीमंडळ गटनेत्याची नियुक्त करण्यात आली नाही. त्यासाठी महाराष्ट्र भाजपकडून निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणींची निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आलीये.
दुसरीकडे सागर बंगल्यावर सुद्धा लगबग बघायला मिळतंय.. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी महायुतीतील नेत्यांची गर्दी केली होती.. यामध्येपंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, संजय कुटे, राहुल कुल, माधुरी मिसाळ, धनंजय मुंडे, मुरजी पटेल, चित्रा वाघ, अतुल सावे, रणधीर सावरकर, नारायण कुचे, प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी भेटी घेतल्याचं दिसून आलंय.. आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी सर्वच नेते कामाला लागले आहेत.. असं असलं तरी उरलेल्या 72 तासात अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे...