Ajit Pawar Candidate List 2024 Expected Names: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्ली येथील घरी मध्यरात्रीनंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत पोहोचले होते. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीमध्ये अमित शाह यांच्या उपस्थितीत जागावाटपावर चर्चा झाली. या बैठकीमध्ये महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला असून त्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आले. जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटल्याची माहिती मिळत असून काही जागांचा निर्णय प्रलंबित आहे. या उरलेल्या जागांचा तिढा महाराष्ट्रातील बैठकीत सोडवला जाणार आहे. असं असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराची यादी 'झी 24 तास'च्या हाती लागली आहे. 


विद्यमान आमदारांना संधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदरांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र राजेंद्र शिंगणे आणि फलटणचे दीपक चव्हाण यांची नाव सध्या चर्चेत असलेल्या संभाव्य यादी नाहीत. दीपक चव्हाण यांनी यापूर्वीच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे. तर राजेंद्र शिंगणे देखील शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा असल्याने त्यांनाही संभाव्य यादीतून वगळण्यात आलं आहे. अजित पवारांच्या पक्षाच्या संभाव्य यादीमध्ये एकूण 39 नावं आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील मतदारसंघांमधून अजित पवारांच्या पक्षातून कोणाला संधी दिली जाईल ते पाहूयात... 


संभाव्य उमेदवारांची यादी - 


1) अजित पवार- बारामती


2) छगन भुजबळ- येवला


3) दिलीप वळसे पाटील- आंबेगाव


3) हसन मुश्रीफ- कागल


5) धनंजय मुंडे- परळी


नक्की वाचा >> पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही...'


6) धर्मराव बाबा आत्राम- अहेरी


7) माणिकराव कोकाटे- सिन्नर


8) नरहरी झिरवाळ- दिंडोरी


9) आदिती तटकरे- श्रीवर्धन


10) दत्तात्रय भरणे- इंदापूर


11) दौलत दरोडा- शहापूर


12) शेखर निकम- चिपळूण


नक्की वाचा >> ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहा


13) सरोज अहिरे- देवळाली


14) किरण लहामटे- अकोले


15) सना मलिक- अणुशक्तीनगर


16) संजय बनसोडे- उदगीर


17) अनिल पाटील- अमळनेर


18) सुनील टिंगरे- वडगाव शेरी


19) अतुल बेनके - जुन्नर


20) संग्राम जगताप- अहमदनगर


21) आशुतोष काळे- कोपरगाव


22) चेतन तुपे- हडपसर


23) सुनील शेळके- मावळ


24) अण्णा बनसोडे- पिंपरी


25) दिलीप मोहिते- खेड आळंदी


26) इंद्रनील नाईक - पुसद


27) नवाब मलिक- शिवाजीनगर मानखुर्द


28) जयसिंह सोळंके- माजलगाव


29) जीशान सिद्धकी- वांद्रे पूर्व


30) मकरंद पाटील - वाई


31) राजू करेमोर - तुमसर


32) मनोहर चंद्रिकापुरे - मोरगाव अर्जुनी


33) राजू नवघरे - वसमत


34) दिलीप बनकर - निफाड


35) बाळासाहेब आजबे - आष्टी


36) नितीन पवार - कळवण


37) बाबासाहेब पाटील - अहमदपूर


38) यशवंत माने -  मोहोळ


39) राजेश पाटील- चंदगड