Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपासाठीच्या तडजोडी केल्या जात आहेत. समोर आलेल्या माहितीसाठी महाविकास आघाडीचं 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला असून पेच निर्माण झालेल्या या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला आहे.
मुंबईतील तीन जागांचा तिढा असून यात वर्सोवा, भायखळा आणि धारावी या मतदारसंघांचा मुद्दा आहे. या मतदारसंघांवर काँग्रेसने दावा केला आहे. वर्सोवा, भायखळा आणि घाटकोपर पश्चिम या मतदारसंघांवर ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. मुंबईतीलच भायखळा, मानखुर्द शिवाजीनगर वर्सोवा आणि अणुशक्ती नगर या जागांवर समाजवादी पक्षाने दावा केला आहे. यात महत्त्वाचा पेच म्हणजे यातील काही जागांवर काँग्रेसने उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित केली असल्याचे समजते. असं असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य 31 उमेदवारांची यादी 'झी 24 तास'च्या हाती लागली आहे. या यादीमध्ये आठ जागा मुंबईतील आहेत तर उर्वरित 23 जागा उर्वरित महाराष्ट्रातील आहेत.
मुंबईतील आठ संभाव्य उमेदवार खालीलप्रमाणे: -
1) आदित्य ठाकरे - वरळी
2) सुनिल राऊत - विक्रोळी
3) सुनिल प्रभू - दिंडोशी
4) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
5) वरुण सरदेसाई - वांद्रे पूर्व
6) रमेश कोरगावंकर - भांडुप पश्चिम
7) संजय पोतनीस - कलिना
8) विनोद घोसाळकर किंवा तेजस्वी घोसाळकर - दहिसर
नक्की वाचा >> पुढचा CM कोण? महायुतीचा मोठा निर्णय! शाह शिंदे, फडणवीस, पवारांना म्हणाले, 'कोणत्याही...'
मुंबई व्यतिरिक्त राज्यात कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
9) भास्कर जाधव - गुहागर
10) कैलास पाटील - धाराशिव
11) उदयसिंह राजपूत - कन्नड
12) राहुल पाटिल - परभणी
13) राजन साळवी - राजापूर
14) वैभव नाईक - कुडाळ
15) नितीन देशमुख- बाळापूर
16)शंकरराव गडाख-नेवासा
17) स्नेहल जगताप - महाड मतदारसंघ
नक्की वाचा >> Maharashtra Assembly Election: अजित पवारांच्या NCP ची संभाव्य यादी समोर! नवाब मलिकांनाही संधी?
18) सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम
19)अद्वय हिरे - मालेगाव बाह्य
20) नितीन सावंत - कर्जत मतदारसंघ
21) अनिल कदम - निफाड
22) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
23) सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण
24) मनोहर भोईर - उरण
25) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
26) राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
27) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
28) कन्नड मतदारसंघ - उदयसिंह राजपूत
29) सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ -
30) राजन तेली - सावंतवाडी
31) दीपक आबा साळुंखे - सांगोला
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.