Maharashtra Assembly Election 2024 Big Fights: विधानसभेच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेली आहे. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघासाठी 1272 उमेदवारांनी 2506 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दौंड आणि कसबा मतदारसंघातून सर्वांत कमी 42 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.  तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 99 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच सहा मोठे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेदवारी अर्ज भरुन झाले असल्याने पुण्यातील महत्त्वाच्या लढती कशा होणार आहेत हे पाहूयात...


पर्वती : 
1) माधुरी मिसाळ, भाजप
2) अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
3) आबा बागुल, अपक्ष -काँग्रेस बंडखोर


हडपसर :
1)  चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस
2) प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
3) साईनाथ बाबर, मनसे


नक्की वाचा >> 2 वाजून 55 मिनिटांना अजित पवारांनी दिलेल्या 'त्या' AB फॉर्मवरुन BJP आक्रमक! म्हणाले, 'महायुतीमधील सर्व...'


कसबा :
1) हेमंत रासने, भाजप
1) रवींद्र धंगेकर, काँग्रेस
2) कमल व्यवहारे, अपक्ष (काँग्रेस बंडखोर)
4) गणेश भोकरे, मनसे


शिवाजीनगर :
1) सिद्धार्थ शिरोळे, भाजप 
2) दत्तात्रेय बहिरट, काँग्रेस
3) मनीष आनंद, अपक्ष ( काँग्रेस बंडखोर)


नक्की वाचा >> अर्ज भरताच कॉन्फिडन्स वाढला! BJP चा उल्लेख करत नवाब मलिक म्हणाले, 'ही युती वैचारिक नाही तर..'


वडगाव शेरी :
1) बापू पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
2) सुनील टिंगरे, राष्ट्रवादी काँग्रेस


खडकवासला : 
1) भीमराव तापकीर, भाजप
2) सचिन दोडके, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
3) मयुरेश वांजळे, मनसे


कॅन्टोन्मेंट : 
1) सुनील कांबळे, भाजप 
2) रमेश बागवे, काँग्रेस


नक्की वाचा >> अर्ज भरतानाच सरवणकरांचा मास्टर स्ट्रोक! आता स्वत: CM शिंदे, राजही काही करु शकत नाहीत; कारण...


कोथरूड :
1) चंद्रकांत पाटील, भाजप
2) चंद्रकांत मोकाटे, शिवसेना ( उद्धव ठाकरे)
3) किशोर शिंदे, मनसे


आज म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. पुण्यामध्ये प्रामुख्याने भाजपा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरस आहे.