Maharashtra Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या उद्देशाने आज अनेक महत्त्वाचे नेते समर्थकांसहीत महसूल कार्यालयांमध्ये हजेरी लावणार आहेत. अगदी मुंबईपासून ते विदर्भ आणि तळ कोकणापर्यंत अनेक उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. सर्वच पक्षांचे प्रमुख उमेदवार आज अर्ज दाखल करतील. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे स्वत: उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. आज कोण कुठून अर्ज भरणार आहे पाहूयात यादी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कळवा-मुंब्रा - विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरणार असून स्वत: शरद पवार यावेळेस उपस्थित राहणार आहेत. 

वरळी - विद्यमान आमदार आदित्य ठाकरे या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्याबरोबर यावेळेस आई-वडील उपस्थित असतील असा अंदाज आहे. 

ठाणे शहर - मनसेचे नेते अविनाश जाधव हे आज ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असून पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे यावेळेस उपस्थित राहणार आहेत. 

ठाणे शहर - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे आज अर्ज भरणार आहेत.

बीड - धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी 11 वाजल्यानंतर ते अर्ज दाखल करणार आहेत. 

येवला - या मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते छगन भुजबळ अर्ज दाखल करणार आहेत. 

कोथरुड - भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

इंदापूर -  इंदापूर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या पक्षाकडून हर्षवर्धन पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

भोर- संग्राम थोपटे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

आंबेगाव - मंत्री दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

जुन्नर - विधानसभेचे विद्यमान आमदार अतुल बेनके विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज आजच दाखल करणार आहेत.

शिरूर - विधानसभेचे विद्यमान आमदार अशोक पवार आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

मावळ - महायुतीचे उमेदवार सुनील शेळके हे आज मेदवारी अर्ज दाखल करणार आहे. वडगाव मावळ येथील महसूल कार्यालयात ते अर्ज दाखल करणार आहेत.

कागल - विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार समरजीत घाटगे आज अर्ज भरणार आहेत.

सांगली - भाजपाचे सुधीर गाडगीळ आज सकाळी 10 वाजता मोठी रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

इस्लामपूर - शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेले जयंत पाटील आज सकाळी 10 वाजता, रॅली काढून अर्ज भरणार आहेत. जयंत पाटलांची सभा देखील आज पार पडणार आहे. ते इस्लामपूर तहसील कार्यालयात अर्ज भरतील. 

कडेगाव - भाजपाचे संग्राम देशमुख कडेगाव तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत.

खानापूर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर आज रॅली काढून अर्ज दाखल करणार आहेत.

तासगाव - कवठेमहांकाळ- शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळेलेल रोहित पाटील सकाळी 11 ते 12 वाजण्याच्यादरम्यान रॅली काढून अर्ज दाखल करणार असून सभा देखील घेणार आहेत.

जत - काँग्रेसचे उमेदवार विक्रम सावंत अर्ज दाखल करणार आहेत.

दक्षिण सोलापूर - या मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य हे आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. 

माढा - आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

लातूर - शहरातून आज वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कांदिवली पूर्व - भाजपाचे नेते अतुल भातखळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करतील.

तिवसा - या मतदारसंघातून काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकुर आज उमेदवारी अर्ज दाखल करतील.

चिमूर - येथून भाजपाचे उमेदवार बंटी भांगडीया उमेदवारी अर्ज दाखल करतील.

हिंगणघाट - भाजपाचे उमेदवार समीर कुणावर हे आज उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. 

दर्यापूर - शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ उमेदवारी अर्ज दाखल करतील.

धामणगाव रेल्वे - या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड अर्ज दाखल करणार आहेत.

शिर्डी - महायुतीचे शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 


याशिवाय धनराज महाले (दिंडोरी), संग्राम जगताप (अहमदनगर), राणी लंके (पारनेर), मिहीर कोटेचा (भांडुप पश्चिम), मंगलप्रभाद लोढा (मलबार हील), कालीदास कोळंबकर (अँटॉप हील), किरण सामंत (राजापूर), राजन साळवी (उद्धव ठाकरे शिवसेना ) (राजापूर) हे सुद्धा आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दापोलीमधून शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश कदम, गुहागरमधून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे भास्कर जाधव, चिपळूणमधून शरद पवारांच्या पक्षाचे प्रशांत यादव उमेदवारी अर्ज आज दाखल करतील. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले भरणार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच  अकोलेचे डॉ. किरण लहामटेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.