मराठवाड्यात OBC, मराठा फॅक्टरबरोबरच बंडखोरीही ठरणार निर्णयाक? `इथं` होणार चुरशीच्या लढती
Maharashtra Assembly Election 2024 Marathwada Big Fights: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मराठवाड्यात निवडणुकांच्या रिंगणात कोण कोण उभं आहे, याचा आढावा घेऊया.
Maharashtra Assembly Election 2024 Marathwada Big Fights: राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारी शेवटची तारीख होती. आज 4 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. आता प्रचाराचा धुरळा उडणार आहे. नेत्यांच्या प्रचारसभांना सुरुवात होणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात निवडणुकीचं चित्र कसं आहे. कोणते उमेदवार रिंगणात आहेत, याचा आढावा घेऊया. दरम्यान, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा मुद्दा पुन्हा चर्चिला जाऊ शकतो. त्यामुळं जातीयवादी समीकरणाचा फटका या निवडणुकीत बसू शकतो.
1 जालना जिल्हा: बिग फाईट्स आणि बंडखोर
- जालना मतदार संघ: काँग्रेस उमेदवार कैलास गोरंटयाल विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यात लढत होणार आहे.
- जालना मतदार संघात रावसाहेब दानवे यांचे बंधू-भास्कर दानवे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- घनसावंगी मतदार संघः राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे विरुध्द भाजपचे बंडखोर सतिष घाटगे विरुद्ध शिंदे शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्यात लढत होणार आहे.
- भोकरदन -भाजप उमेदवार संतोष दानवे विरूध्द राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार चंद्रकांत दानवे एकमेकांविरोधात लढणार आहे.
- परतूर- भाजप उमेदवार बबनराव लोणीकर विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी आमदार सुरेश जेथलिया यांच्यात लढत होणार आहे
या मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार ए.जे.बोराडे आहेत
2 छत्रपती संभाजीनगरः बिग फाईट्स आणि बंडखोर उमेदवार
- औरंगाबाद पूर्व येथून भाजप अतुल सावे विरुद्ध एम आय एमचे इम्तियाज जलील निवडणुकीच्या रिंगणात आहेत
- औरंगाबाद पश्चिम येथून शिवसेनेचे संजय शिरसाठविरुद्ध ठाकरे सेनेच्या राजू शिंदेयांचे आव्हान आहे
- सिल्लोड येथून अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठाकरे सेनेच्या सुरेश बनकर यांचे आव्हान
- पैठण विलास बापू भूमरे शिंदे शिवसेना ( खासदार संदीपान भूमरे यांचे चिरंजीव ) विरुद्ध ऊबाठा दत्ता गोरडे
- गंगापूर येथून भाजपच्या प्रशांत बंब विरुद्ध एनसीपी शरद पवार पक्षाकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
3 नांदेड मतदारसंघ
भोकर - खा.अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण भोकरमध्ये महायु्तीकडून लढत आहे. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील कोंढेकर यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती इथे ताकद पणाला लावणार आहे.
नायगाव - माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सून मीनल खतगावकर महाविकास आघाडीकडून लढत आहेत. इथे भाजपचे विद्यमान आमदार राजेश पावार रिंगणात आहेत.
मुखेड - महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर, महायुतिकडुन विद्यमान आमदार राजेश पवार रिंगणात आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर अपक्ष म्हणून लढत आहेत.
4 बीड मतदारसंघ
बीड मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर विरुद्ध राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर दिवंगत नेते विनायम मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या अपक्ष निवडणूक लढणार आहेत.
- गेवराई मतदार संघशिवसेना ठाकरे गट बदामराव पंडित विरुद्ध राष्ट्रवादी पक्षाच्या विजयसिंह पंडित यांच्यात लढत होणार आहे. तर भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
माजलगाव विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रवादी पक्षाचे प्रकाश सोळंके विरुद्ध शरद पवार पक्षाने मोहन जगताप यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमधून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलेले रमेश आडसकर यांना उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली आहे.
परळी मतदारसंघ
राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे विरुद्ध शरद पवारांच्या पक्षाने राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे राजाभाऊ फड यांनी बंडखोरी केली आहे.
कैज मतदारसंघ
भाजपच्या नमिता मुंदडा यांच्याविरुद्ध शरद पवार पक्षाने पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने संगीता ठोंबरे यांनी केली बंडखोरी
आष्टी मतदारसंघ
भाजप सुरेश धसविरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने महबूब शेख यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार भीमराव धोंडे यांची बंडखोरी