Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या (Raj Thackeray) राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षानं नुकतीच विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवार यादी जाहीर केली. यंदाच्या निवडणुकीत महायुतीसुद्धा या पाठिंब्याची परतफेड करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. पण, सध्यातरी तसं चित्र मात्र स्पष्ट दिसत नसल्यानं हा पाठिंबा नेमका कधी आणि कसा मिळणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे असंख्य चर्चा आणि अनेक नावांनी डोकं वर काढलं असतानाच दुसरीकडे मात्र मनसेनं विधानसभेसाठीची तयारी सुरु केल्याचं स्पष्ट होत आहे. मंगळवारीच मनसेनं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसरी उमेदवार यादी जाहीक केली. यामध्ये 45 उमेदवारांच्या नावे तिकीट गेल्याचं स्पष्ट झालं. याआधीच्या म्हणजेच पहिल्या उमेदवार यादीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव या अवघ्या दोन नावांचाच समावेश होता. 


पहिल्यामागोमाग मनसेची दुसरी यादीसुद्धा समोर आली. मात्र, या यादीत 45 जणांपैकी बालेकिल्ला नाशिक शहरातील एकही उमेदवार नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं. इतकच नाही, तर नाशिक जिल्ह्यातही उमेदवार दिला नाही त्यामुळंही नाशिकमधून मनसेची हवा गोल झाली की काय, अशी राजकीय चर्चा जोर धरताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटं


 



एकेकाळी नाशिक शहरात तीन आमदार, नाशिक महापालिका पूर्णपणे ताब्यात, जिल्हा परिषद ग्रामपंचायत वरही अनेक ठिकाणी मनसेचा झेंडा होता. मात्र आज उमेदवारही मिळू नये अशीच परिस्थिती दिसून येत असल्यामुळं बालेकिल्ल्याचा मनसेला विसर पडला की काय? असाच प्रश्न मतदारही विचारताना दिसत आहेत. 


मनसेच्या दुसऱ्या यादीची वैशिष्ट्य 


  • यादीत 45 उमेदवारांचा समावेश

  • आदित्य ठाकरेंच्या वरळीतून संदीप देशपांडे लढणार

  • अमित ठाकरे यांना माहिम मधून उमेदवारी

  • दिवंगत गोल्डमॅन, आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे यांना खडकवासल्यातून उमेदवारी

  • एकेकाळी मनसेचा गड समजल्या गेलेल्या नाशिकमधून पहिल्या यादीत एकही उमेदवार नाही