Maharashtra Politics : अहमदनगरच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. संगमनेर मतदारसंघातून (Sangamner Assembly Constituency) माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली होती. मात्र एकाच घरत दोघांना उमेदवारी नको असं सांगत भाजपनं (BJP) त्यांना तिकीट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महायुतीमध्ये संगमनेरची जागा ही शिवसेनेकडे आहे.. त्यामुळे या जागेवर कोणता उमेदवार असणार याबाबत चर्चा रंगलीये. सुजय विखे पाटलांना उमेदवारी नाकारल्यानं बाळासाहेब थोरात आणि सुयज विखेमधील बिग फाईट टळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विखे पाटलांनी जरांगेंची घेतली भेट?
सुजय विखेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आलेली असतानाच राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत भेट घेतली. विखे पाटील आणि जरांगे यांच्या बंददाराआड झालेल्या चर्चेबाबत उत्सुकता निर्माण झालीय. सुजय विखे पाटील अपक्ष लढण्याबाबत चाचपणी करत नाही ना अशी चर्चा सुरु झालीय. अपक्ष लढायचं असल्यास मराठा समाजाची रसद मिळेल का याचा राधाकृष्ण विखे पाटील अंदाज तर घेत नाही ना असंही बोललं जातंय. सुजय विखे पाटील यांनी यापूर्वी संगमनेर किंवा राहुरीतून लढण्याची तयारी दाखवली होती.


सुजय विखे पाटील अपक्ष लढणार?
2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुजय विखे पाटलांनी नगर दक्षिणमधून काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी भाजपचं कमळ हातात घेतलं होतं. तसं विखे पाटील घराण्याला पक्ष बदलणं नवं नाही. त्यामुळं राज्यातील बदललेलं राजकीय वारं पाहून सुजय विखे पाटील अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेऊ शकतात असं बोललं जातंय.


भाजपची पहिली यादी येणार नाही?
दरम्यान, आजही भाजपची यादी येणार नसल्याची  माहिती समजतेय. आज भाजप उमेदवारीची पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती होती. मात्र आजही भाजपची पहिली यादी जाहीर होणार नसल्याची माहिती आहे.. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीच्या यादीला मुहूर्त कधी लागणार हे पाहावं लागणार आहे. 


ब्राम्हण समाजाची भाजपकडे मागणी
राज्यातील 288 पैकी 30 जागांवर ब्राम्हण समाजाचा उमेदवारा द्यावा अशी मागणी सकल ब्राम्हण समाजाने केलीये. पुण्यातील कसबा मतदारसंघही ब्राम्हण समाजालाच द्यावा आणि त्या जागेवर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंना उमेदवारी द्यावी अशी मागणीही ब्राम्हण समाजाने केलीये. कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ब्राह्मण उमेदवारालाच संधी द्या अशी आग्रही मागणी सकल ब्राह्मण समाजाचे भालचंद्र कुलकर्णी आणि राशीचक्र फेम भगरे गुरूजींनी भाजपकडे केलीये.