Maharashtra Assembly Election Ajit Pawar Angry: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या जाहीर भाषणामध्ये खास शैलीमध्ये मतदारांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांनी आज प्रचाराच्या शेवटच्या रविवारी बारामतीमधील माळेगाव खुर्द आणि ढाकाळे या गावांना भेट दिली. ग्रामस्थांशी मनमोकळा आपलेपणाचा संवाद साधला. गावातील प्रलंबित कामांकडे जातीनं लक्ष देऊन ती मार्गी लावू, असा शब्द अजित पवारांनी गावकऱ्यांना दिला. तसंच गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर ठोस पावलं उचलू, असं आश्वसनही अजित पवारांनी दिलं. मात्र त्याचवेळी त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये गावकरी कामं करुनही साथ देत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.


एवढं जीव तोडून काम करतोय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाने अजित पवारांसमोर कच-याची समस्या मांडली, त्यावर अजित पवारांनी, "अजित पवारला पाच सभा घ्यायच्यात दहा वाजता प्रचार बंद करायचाय हे माहिती असताना काहीही प्रश्न उपस्थित करता. एवढं जीव तोडून काम करतोय दुसऱ्या तालुक्यात काम केलं असतं तर लोक डोक्यावर घेऊन नाचली असती. बिनविरोध निवडून दिलं असतं. जिथे पिकतं तिथं विकत नसतं. शिरूर हवेलीला लोक उभा रहा म्हणत होते. एकजण म्हणाला दादा तहान भागल्यावर पाणी द्या हो, तुम्ही तहान भागाच्या अगोदर पाणी देताय ज्याची किंमत राहिली नाही. मला शिरूर-हवेलीला सिन्नरला आणि पुरंदरलाही बोलवलं होतं. पण सगळेजण म्हणाले दादा तुम्ही आमच्या तालुक्यात कशाला तिकडे जाताय? माझ्यावर तुम्ही आजपर्यंत विश्वास ठेवला आताही विश्वास ठेवा. मागे लोकसभेला झालेलं मी विचारणार नाही," असं अजित पवार गावकऱ्यांना म्हणाले.


अधिकारी माझं ऐकतात ना?


"महिलांसाठी लाडकी बहीण, 3 सिलेंडरची योजना, वयोश्री योजना आणली. दुधाचं अनुदान आता 7 रुपये अनुदान केले आहे. दुधाला पैसे मिळावेत ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांची तिथे भावना आहे. साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या पंपांच वीज बिल माफ केले आहे. प्रशासनावर माझी पकड आहे. अधिकारी माझं ऐकतात ना? बघू करू सांगतात का?" असं अजित पवारांनी गावकऱ्यांना विचारलं. 


नक्की वाचा >> 'मी साहेबांना सोडलेलं नाही, सगळ्याच...'; शरद पवारांबद्दल अजित पवारांनी केलेल्या विधानाने खळबळ


मी काय सालकरी गडी आहे का?


"सोमेश्वरला, सुपेला, पिंपळीला इंग्लिश मीडियम स्कूल सुरु केलं. बारामतीत 1972 साली साहेबांनी विद्या प्रतिष्ठान काढलं. शिक्षणाच्या सोई केल्या. यावेळी तुम्ही मला चांगल्या मताधिकेने राज्याच्या विधानसभेत पाठवा. आज तिथे प्रमुख नेते आहेत त्यात मी पण आहे. काय पण तिथे घडू शकतं. सर्व कामे केली. रस्ते केले की लोकांना किंमत कळत नाही. एकाने सांगितले रस्ता पूर्ण करण्यापेक्षा थोडा शिल्लक ठेवायला पाहिजे मग दोन्हीतला फरक कळतो. पण लोक म्हणतात त्याला काय जातयं तो उपमुख्यमंत्री आहे केलचं पाहिजे मी काय सालकरी गडी आहे केलचं पाहिजे?" असा सवाल अजित पवारांनी विचारला.



एकदा संधी द्यावी, मी...


"आमदाराला निधी किती असतो? पाच वर्षात 15 कोटी इकडेच दिलेत. बाकीच्यांनी काय चुना लावायचा का? याची कुठेतरी जाणीव ठेवा. आजुबाजुच्या तालुक्यात काय परिस्थिती आहे बघा. दादा कामाचा माणूस आहे. फक्त बटणं कुठली दाबायची ती यांनी दाबायची. माझी विनंती आहे की तुम्ही संधी द्यावी त्या संधीचं मी सोनं करीन एवढेच सांगतो.