Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar NCP 3rd Candidate List : विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेस यांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलीय आहे. तिसऱ्या यादीत चार उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नावं जाहीर केली. गेवराईतून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमध्ये दिलीप काका बनकर आणि पारनेरमधून काशिनाथ दाते यांना संधी देण्यात आलीय. 
राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली यादी ही बुधवारी 23 ऑक्टोबरला जाहीर केली होती. यात उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून लढणार हे स्पष्ट झालं. पहिल्या यादीत 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर दुसऱ्या यादीत RR पाटलांच्या लेकाविरुद्ध कोणाला संधी दिली हे स्पष्ट झालं. दुसऱ्या यादी 7 जागांचे उमेदवार सांगण्यात आले होते. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून 49 उमेदवाऱ्यांची नावं घोषित केली असून अजित पवार यांनी कोणावर विश्वास दाखवला आहे पाहा. 


राष्ट्रवादी काँग्रेसची आतापर्यंत झालेले 49 उमेदवार पाहा!


बारामती - अजित पवार
येवला - छगन भुजबळ
आंबेगाव -  दिलीप वळसे पाटील
कागल - हसन मुश्रीफ
परळी - धनंजय मुंडे
दिंडोरी - नरहरी झिरवाळ
अहेरी - धर्मराव बाबा आत्राम
श्रीवर्धन - आदिती तटकरे
अंमळनेर - अनिल भाईदास पाटील
उदगीर - संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
माजलगाव - प्रकाश दादा सोळंके
वाई - मकरंद पाटील
सिन्नर - माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते
अहमदनगर शहर - संग्राम जगताप
इंदापूर - दत्तात्रय भरणे
अहमदपूर - बाबासाहेब पाटील
शहापूर - दौलत दरोडा
पिंपरी - अण्णा बनसोडे
कळवण - नितीन पवार
कोपरगाव - आशुतोष काळे
अकोले - किरण लहामटे
बसमत - चंद्रकांत उर्फ राजू नवघरे
चिपळूण - शेखर निकम
मावळ - सुनील शेळके
जुन्नर - अतुल बेनके
मोहोळ - यशवंत विठ्ठल माने
हडपसर - चेतन तुपे
देवळाली - सरोज आहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतपुरी - हिरामण खोसकर
तुमसर - राजू कारेमोरे
पुसद इंद्रनील नाईक
अमरावती शहर - सुलभा खोडके
नवापूर - भरत गावित
पाथरी - निर्मला उत्तमराव विटेकर
मुंब्रा - कळवा - नजीब मुल्ला
इस्लामपूर - निशिकांत पाटील
तासगाव-कवठे महांकाळ - संजयकाका पाटील
अणुशक्ती नगर - सना मलिक
वांद्रे पूर्व - झिशान सिदिकी
वडगाव शेरी - सुनील टिंगरे
शिरुर - ज्ञानेश्वर (माऊली) कटके
लोहा - प्रताप चिखलीकर
गेवराई - विजयसिंह पंडित
फलटण - सचिन पाटील
निफाड - दिलीप काका बनकर
पारनेर - काशिनाथ दाते