BJP tension of Rebel: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांचं अक्षरक्षः पीक आल्याचं समोर आलंय. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडोबांची संख्या मोठी असल्याचं पाहायला मिळतंय. आपापल्या पक्षाकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून बसलेल्या अनेक नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही. काहींची समजूत काढली तर काहींनी बंडाचा झेंडा उभारलाय.
 
बोरिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते गोपाळ शेट्टींनी बंडखोरी केलीय.रामटेकमध्ये काँग्रेसच्या राजेंद्र मुळक यांनी बंडाचा झेंडा उभारलाय.बीड मतदारसंघात ज्योती मेटेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. चंदगडमध्ये भाजप नेते शिवाजी पाटील बंडाच्या पवित्र्यात आहेत
करवीरमध्ये महायुतीविरोधात जनसुराज्य पार्टीचे संताजी घोरपडेंनी बंडाचा झेंडा हातात घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इचलकरंजीतही भाजप नेते हिंदुराव शेळकेंनी बंड केलंय.कोल्हापूर उत्तरमध्ये मविआत राजेश लाटकरांनी बंड केलंय.नांदेडच्या मुखेडमध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव बालाजी खतगावकर यांनी बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय.नांदेड उत्तर मधून भाजपचे मिलिंद देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. ही जागा शिंदे शिवसेनेकडे गेली आहे.


गोपाळ शेट्टींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न


भाजपाने गोपाळ शेट्टींना उमेदवारी अर्ज नाकारल्याने बोरिवलीतून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. पक्षाने मुंबई उपाध्यक्ष संजय उपाध्याय यांना बोरीवलीमधून उमेदवारी दिल्याने शेट्टी नाराज झाले आहेत. आयात उमेदवारांना संधी दिले जाते अशी शेट्टी यांचा आक्षेप आहे. संजय उपाध्याय यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक नेते नाराज असून नाराज स्थानिक नेत्यांमध्ये गोपाळ शेट्टींबरोबरच शिवानंद शेट्टी, गणेश खणकर, प्रविण दरेकर यांच्या कार्यकर्त्यांचाही समावएश आहे. यापूर्वीही या मतदारसंघातून विनोद तावडे, सुनिल राणे हे उमेदवार देण्यात आले होते. आयात उमेदवारांच्या मुद्द्याला कंटाळून आता स्थानिकांनी पक्षाविरुद्ध बंड केलं आहे. रस्त्यावर उतरून गोपाळ शेट्टी समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचं या मतदारसंघात पाहायला मिळालं.नाराज गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्यासाठी सोमवारी रात्री मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार गोपाळ शेट्टी यांच्या भेट घेतली. मात्र त्यांना गोपाळ शेट्टींची समजूत घालण्यात अपयश आलं. त्यानंतर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजप आमदार योगेश सागर गोपाळ शेट्टी यांच्या घरी गेले होते. मात्र त्यांनाही यात यश आलं नाही. गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


या ठिकाणीही झाली बंडखोरी


भाजपाने शिंदेंच्या पक्षासोबत केलेल्या तडजोडीमुळे त्यांना मुंबादेवीमध्येही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. येथे अतुल शाह यांनी बंडखोरी केली आहे. हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाला आहे. त्यामुळेच इथे तडजोड करुन इथून शिंदेंनी भाजपातून पक्ष प्रवेश केलेल्या महिला नेत्या शायना एनसी यांना उमेदवारी दिल्याने अतुल शाह यांनी बंडखोरीचं हत्यार उपसलं आहे. घाटकोपरमध्येही पराग शाह यांना तिकीट दिल्याने प्रकाश मेहता यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


पक्षाचे अधिकृत उमेदवार संकटात


प्रत्येक पक्षात बंडखोर निर्माण झालेत. या बंडखोरांमुळे पक्षाचे अधिकृत उमेदवार संकटात आलेत. आता मविआ आणि महायुतीचे नेते बंडोबांचा थंडोबा करण्यासाठी काय काय कृप्त्या लढवतात ते पाहाणं औसुक्याचं ठरणार आहे.