Congress first 48 Candidate names: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात राष्ट्रीय पक्ष काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी होते. दरम्यान आता काँग्रेसनेदेखील आपल्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.  काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 48 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरद पवार याची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि पक्ष इतर सहकारी पक्ष आहेत. महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीत तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी 85 उमेदवार असतील, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यानंतर आज काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 


कराड दक्षिण येथून पृथ्वीराज चव्हाण, साकोलीतून नाना पटोले, धामणगावमधून विरेंद्र जगताप,तिवसातून यशोमती ठाकूर, ब्रम्हपुरीतून विजय वडेट्टीवार रिसोडमधून अमित झनक, उत्तर नागपूरमधून नितीन राऊत, पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे, देवळी (वर्धा)मधून 
रणजित कांबळे, राजूरा ( चंद्रपूर)मतदार संघातून सुभाष धोटे, अमरावती शहरमधू डॉ सुनील देशमुख, अचलपूरमधून बबलू देशमुख तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की लिस्ट। pic.twitter.com/tElqOKF6ak


— Congress (@INCIndia) October 24, 2024


48 उमेदवारांची पहिली यादी


1.कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर -  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण -  कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड - अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी - रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम -  प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती -  बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम -  विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली -  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी -  विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर -  सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव -  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री -  विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख
32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप
36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे
40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण - रुतुराज संजय पाटील
45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC) 
47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत