`दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग,` सतेज पाटील सर्वांसमोर संतापले; शाहू महाराजांना म्हणाले `मला कशाला...`
Satej Patil Gets angry on Shahu Maharaj Supporters: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी आज माघार घेतली. यामुळे काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली असून, सतेज पाटील (Satej Patil) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. `दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग`, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयातून ते निघून गेले.
Satej Patil Gets angry on Shahu Maharaj Supporters: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत होती. राज्यभरात अनेक बंडखोर तसंच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांचाही समावेश आहे. मधुरीमाराजे यांच्या उमेदवारीवरुन फार नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. पक्षातील वरिष्ठांनी राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि काँगेसची नाचक्की झाली. यामुळे सतेज पाटील (Satej Patil) चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग', अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयातून ते निघून गेले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. येथे विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यांच्या जागी काँग्रेसने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. पण नंतर सूत्रं फिरली आणि पक्षातील वरिष्ठांनी प्रसाद लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरीमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. मधुरीमाराजे यांनी एबी फॉर्म देण्यात आला होता. यानंतर त्यांनी अर्जदेखील दाखल केला. मात्र यामुळे राजेश लाटकर नाराज झाले होते आणि त्यांन अपक्ष अर्ज दाखल केला होता.
यादरम्यान आज अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असतानाच मधुरीमाराजे यांनी माघार घेतली. यामुळे बंडखोर राजेश लाटकर आणि शिंदेच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांच्यात लढत होणार हे आता स्पष्ट आहे. राजेश लाटकर हे पक्षातील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. त्यांची नाराजी पक्षाला परवडणार नाही असं सांगत खासदार शाहू छत्रपती यांनी अर्ज मागे घेतल्याचं कारण दिलं.
सतेज पाटलांचा जिल्हाधिकारी कार्यालयात संताप
मधुरीमाराजे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील मात्र चांगलेच संतापलेले पहायला मिळालं. दम नव्हता तर उमेदवारी कशाला घेतली? अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. जर लढायचे नव्हते तर उमेदवारी घ्यायलाच नको होती. मी माझी ताकद दाखवली असती अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.
जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज मागे घेऊन मधुरीमाराजे गेल्यानंतर दरवाजातच सतेज पाटील यांनी शाहू छत्रपती यांना सांगितलं की, "हे पूर्णपणे माझी फसवणूक केल्यासारखं आहे. हे नाही चालणार. मग आधीच नाही म्हणून निर्णय घ्यायला हवा होता. मला काही अडचण नव्हती. हे चुकीचं आहे महाराज. हे मला काही मान्य नाही. मला तोंडघशी पाडण्याची गरज नव्हती".
दरवाजातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शाहू महाराजांच्या समर्थकांना म्हणाले, "हे अजिबात बरोबर नाही, तुम्ही जेवढ्यांनी आग लावली त्या सर्वांना सांगत आहे". तसंच बाहेर उभ्या समर्थकांना, "दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना मग, मी माझी ताकद दाखवली असती"स अशा शब्दांत सुनावलं आणि रागारागात निघून गेले.