Maharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. असं असलं तरी महायुती किंवा मविआला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीय. त्यामुळे सत्तेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि मविआच्या नेत्यांनी आतापासून अपक्षांसाठी फिल्डिंग लावायला सुरूवात केलीय.
महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय. बहुतांश एक्झिट पोलचा असाच अंदाज असल्यानं सत्तास्थापनेसाठी महायुती किंवा मविआ यांना अपक्षांसोबतच लहान पक्षांच्या आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसे, शेकाप, वंचित, बविआ आणि प्रहारसोबतच अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांसाठी दोन्ही बाजुंनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरूवात झालीय. तर वेळ पडल्यास अपक्षांची मदत घेऊ अशी प्रतिक्रीया शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलीय.
तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपण कुणाशीही संपर्क साधला नसल्याचं म्हटलंय.
कोणत्या मतदारसंघात अपक्षांच्या विजयाची शक्यता वर्तवली जातेय.. त्यावर एक नजर टाकुया.
आतापासून अपक्षांसाठी फिल्डिंग
विजयाची शक्यता असलेले अपक्ष
- रवी राणा - बडनेरा
- समीर भुजबळ - नांदगाव
- राहुल जगताप - श्रीगोंदा
- सत्यजीत पाटणकर - पाटण
- राजेंद्र मुळक - रामटेक
- विजय चौगुले - ऐरोली
- सुधाकर घारे - कर्जत, रायगड
- भिमराव धोंडे - आष्टी पाटोदा
- रमेश आडसकर - माजलगाव
- राजेश लाटकर - कोल्हापूर उत्तर
त्यामुळे खरंच एक्झिट पोलसारखे निकाल आले आणि अपक्षाची सत्तास्थापनेसाठी गरज लागणार असेल तर अपक्षांचे भाव नक्की वाढणार यात शंका नाही...