ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमाचा एक्का!कोपरीकरांचा कौल कोणाला?
Eknath Shinde Vs kedar Dighe: धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात एकनाथ शिंदेंविरोधात उतरवून ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना मोठं आव्हान दिलंय
Eknath Shinde Vs Kedar Dighe: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्याविरोधात ठाकरेंकडून धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला उमेदवारी देण्यात आलीय. दिघेंना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने आता कोपरी पाचपाखाडीमध्ये शिंदे विरुद्ध दिघे असा सामना रंगणार आहे.धर्मवीर आनंद दिघे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरू आहेत.आनंद दिघे यांच्या हिंदूत्वाच्या विचारांवरच आपण वाटचाल करतोय हे एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगीतलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा सामना गुरूंच्या पुतण्याशीच होणाराय. कारण ठाकरे गटाकडून कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आलीय.
कोपरी पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे हे विद्यमान आमदार आहे.. त्यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून केदार दिघे यांना मैदानात उतरवलं असल्याचं बोललं जातंय.केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. ते शिवसेना (UBT) पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. 2006 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता.
दरम्याम शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केदार दिघेंच्या उमेदवारीवरूनउद्धव ठाकरेंवर टीका केलीय.केदार दिघे रिंगणात उतरल्याने कोपरी पाचपाखाडीत बिग फाईट होणाराय. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्याला कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात एकनाथ शिंदेंविरोधात उतरवून ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंना मोठं आव्हान दिलंय. आनंद दिघेंचा पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ठाण्यातील जुना शिवसैनिक त्यांच्यासोबत उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही..
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी -
चाळीसगाव उन्मेष पाटील
पाचोरा - वैशाली सुर्यवंशी
मेहकर - सिद्धार्थ खरात
बाळापूर - नितीन देशमुख
अकोला पूर्व - गोपाल दातकर
वाशिम - सिद्धार्थ देवळे
बडनेरा - सुनील खराटे
रामटेक - विशाल बरबटे
वणी - संजय दरेकर
लोहा - एकनाथ पवार
कळमनुरी डॉ. संतोष टारफे
परभणी डॉ. राहुल पाटील
गंगाखेड - विशाल कदम
सिल्लोड - सुरेश बनकर
कन्नड - उदयसिंह राजपूत
संभाजीनगर मध्य - किशनचंद तनवाणी
संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे
वैजापूर - दिनेश परदेशी
नांदगाव - गणेश धात्रक
मालेगाव बाह्य - अद्वय हिरे
निफाड - अनिल कदम
नाशिक मध्ये- वसंत गीते
नाशिक पश्चिम - सुधाकर बडगुजर
पालघर (अज)- जयेंद्र दुबळा
बोईसर (अज) - डॉ. विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण (अज) - महादेव घाटळ
अंबरनाथ (अजा) - राजेश मानखेडे
डोंबिवली - दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर
ओवळा- माजिवडानरेश मणेरा
कोपरी- पाचपाखाडी - केदार दिघे
ठाणे - राजन विचारे
ऐरोली- एम के मढवी
मागाठाणे - उदेश पाटेकर
विक्रोळी - सुनील राऊत
भांडुप पश्चिम - रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व - अनंत (बाळा) नर
दिंडोशी - सुनील प्रभु
गोरेगाव - समीर देसाई
अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके
चेंबुर- प्रशांत फातपृर्पेकर
कुर्ला (अजा) - प्रविणा मोरजकर
कलीना -संजय पोतनीस
वांद्रे पूर्व - वरुण सरदेसाई
माहिम- महेश सावंत
वरळी - आदित्य ठाकरे
कर्जत- नितीन सावंत
उरण - मनोहर भोईर
महाड स्नेहल जगताप
नेवासा - शंकरराव गडाख
गेवराई - बदामराव पंडित
धाराशिव - कैलास पाटील
परांडा - राहुल पाटील
बार्शी - दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण - अमर रतिकांत पाटील
सांगोले - दिपक आबा साळुंखे
पाटण - हर्षद कदम
दापोली - संजय कदम
गुहागर - भास्कर जाधव
रत्नागिरी - सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर - राजन साळवी
कुडाळ - वैभव नाईक
सावंतवाडी - राजन तेली
राधानगरी - के. पी. पाटील
शाहुवाडी - सत्यजीत आबा पाटील